Friendship Day : फेसबुकवरची मैत्री ही खरी मानायची की खोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 12:14 PM2018-08-05T12:14:16+5:302018-08-05T12:25:16+5:30

अरे हो मी त्याला ओळखतो, तो तर माझा फेसबूकवर मित्र आहे असं बोलता बोलता कोणीतरी सहज सांगतं. पण फेसबूकवर केवळ फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली , चारदोन लाइक्स इकडेतिकडे गेले म्हणजे नक्की मैत्री का?

Friendship Day: Friendship on Facebook in true or false | Friendship Day : फेसबुकवरची मैत्री ही खरी मानायची की खोटी?

Friendship Day : फेसबुकवरची मैत्री ही खरी मानायची की खोटी?

Next

अरे हो मी त्याला ओळखतो, तो तर माझा फेसबूकवर मित्र आहे असं बोलता बोलता कोणीतरी सहज सांगतं. पण फेसबूकवर केवळ फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली , चारदोन लाइक्स इकडेतिकडे गेले म्हणजे नक्की मैत्री का? तुझ्या गावी आलो की नक्की भेटेन, एकदा नक्की भेटू असं वारंवार एकमेकांना सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. हे असं का होत असतं? प्रत्यक्षात भेटण्यापेक्षाा फक्त फेसबूकवरच्या भेटीचं समाधान लोकांना का वाटावंं? त्यांना वेळ नसतो? कामात खरंच गुंग असतात? ते भेटायला घाबरत असतात की आपण उघडे पडू अशी भीती त्यांना वाटत असते ?

या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही प्रसिद्ध लेखक आणि संगिताचे अभ्यासक मुख्य म्हणजे आजच्या पिढीचे प्रतिनिधी असणार्या डॉ. आशुतोष जावडेकर यांना हा प्रश्न विचारला. ते म्हणतात, आपण प्रत्यक्षात भेटतो तेव्हा एका क्षणात आपल्याला समोरच्या माणसाच्या अनेक सवयी, लकबी ध्यानात येतात. काही प्रश्न असतील त्याचे तर तेही कळू शकतात. त्याचं नुसता वावर भारावून टाकू शकतो आपल्याला कधी. कधी हात हातात घेतले जातात. फेसबुक किंवा व्हाट्सअप मैत्रीत अनेकदा तासंतास चॅट  होतात, एकमेकांचे फोटो शेअर केले जातात, अनेक मनाच्या आतल्या गोष्टी ज्या आपण कधी पटकन सख्ख्या मित्रालाही सांगणार नाही त्या फेसबुक मैत्रीत बोलतो. मैत्री आणि आकर्षण आणि प्रेम हे टप्पेही धूसर असतात ऑनलाइन मैत्रीत ! 

आभासी किंवा खरी मैत्री यातलं  चांगलं वाईट असं काही ठरवता येणार नाहीत. आभासी मैत्रीने समानधर्मी मिळतात. छोट्या गावात राहणारे माझे अनेक तरुण मित्र, फॅन्स आहेत. त्यांना त्या गावात समानशीलाचे लोकं  पटकन सापडत नाहीत. पण आता सोशल मीडियामुळे त्यांची बौद्धिक उपासमार होत नाही आणि उलट भावनिक गुंतवणूकही होत राहते. मोठ्या शहरात समानधर्मी मिळू शकतात पटकन, पण मिळतीलच असं नसतं . ट्रॅफिकमुळे एकेक उपनगर हे एक एक छोटं गावंच  झालं आहे. तिथेही आभासी मैत्री जोरात असते. आभासी मैत्रीतून खऱ्या भेटीच्या मैत्रीत रूपांतर होताना अनेक पथ्य पाळावी लागतात. खऱ्या मैत्रीही सध्या आभासी जगात उजाळा द्यावा लागतो. मिसळून गेलं आहे हे जग. पण हे राहत, की  मैत्रीइतकं अवघड, सुंदर, जीवघेणं आणि तरी हवंहवंसं वाटणार दुसरं काही नसतं. आणि भेटलाच सख्खा मित्र, सखा तर अवघं आयुष्य उजळून जातं !

Web Title: Friendship Day: Friendship on Facebook in true or false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.