ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर येण्याचा एकमेव उपाय, रिसर्चमधून खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:06 AM2018-08-22T11:06:29+5:302018-08-22T13:21:20+5:30

काहीजण यातून सहजासहजी बाहेर येऊच शकत नाहीत. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलाय. 

Best way to come out of breakup pain according to science | ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर येण्याचा एकमेव उपाय, रिसर्चमधून खुलासा!

ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर येण्याचा एकमेव उपाय, रिसर्चमधून खुलासा!

Next

ब्रेकअपनंतर त्या व्यक्तीचं सगळंकाही बदलून जातं. कशातचं काही लक्ष लागत नाही. काही नवीन करण्यात त्या व्यक्तीला इंटरेस्ट राहत नाही. मनाला ठेच लागलेल्या लोकांसाठी जणू वेळ थांबलेली असते. यातून बाहेर निघण्यासाठी वेगवेगळ उपाय सांगितले जातात. पण प्रत्येकालाच यातून बाहेर यायला जमतं असं नाहीये. काहीजण यातून सहजासहजी बाहेर येऊच शकत नाहीत. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलाय. 

अमेरिकेतील मिसोरी राज्यात काही अभ्यासकांनी ब्रेकअप आणि त्यातून होणारा त्रास व भावना यावर अभ्यास केला. यासाठी अभ्यासकांनी २० ते ३७ वर्ष वयाच्या २४ महिला-पुरुषांसोबत संवाद साधला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, ब्रेकअपनंतर त्यांची स्थिती कशी आणि आता ते कशा स्थितीत आहेत. 

या तीन गोष्टी करायला सांगितल्या

१) या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सहभागी लोकांनी तीन काम करण्यास सांगितले. पहिलं हे की, ते त्यांच्या एक्स पार्टनरबाबत जितका वाईट विचार करु शकतात तितका करा. त्यांच्या वाईट सवयी, वाईट गोष्टी आठवा आणि त्यांच्याविषयी मनात राग आणा.

२) त्यानंतर सहभागी लोकांना त्यांच्या वास्तविक भावना समजण्यास आणि व्यक्त करण्यास सांगितले. यावेळी त्यांना काय वाटतंय, किती त्रास होतोय आणि दिवसभर त्यांच्या डोक्यात काय काय सुरु असतं हे व्यक्त करायला सांगितले. 

३) तिसऱ्यावेळी अभ्यासकांनी सहभागी लोकांना त्या गोष्टींना आठवण्यास सांगतिले जे काम करुन ते त्यांचं ब्रेकअपचं दु:खं विसरु शकतात. ही कामं काहीही असू शकतात, जसे की, संगीत ऐकणे, मित्रांना भेटणे, टीव्ही बघणे, कॉलेज किंवा ऑफिसचं काम करणे इत्यादी.

काय निघाला निष्कर्ष?

या अभ्यासातून अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला की, या तिनही पर्यांयापैकी सर्वात पहिली आयडिया यशस्वी ठरली. म्हणजे जर तुम्ही तुमच्या एक्सबाबत वाईट विचार करता, त्याचा राग करता तेव्हा ब्रेकअपच्या वेदनेतून लवकर बाहेर येता. 

अभ्यासकांनी हेही सांगितले की, एक्स पार्टनरसाठी निगेटीव्ह फिलींग्स आणताना त्रास नक्कीच होतो. पण ही भावनात्मक अडचण केवळ काही वेळासाठी होते. मात्र ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी परफेक्ट आयडिया आहे. 

Web Title: Best way to come out of breakup pain according to science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.