उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 11:35 AM2018-04-13T11:35:25+5:302018-04-13T11:36:19+5:30

घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचेही अनेक फायदे आहेत.

Advantages of getting married later in life | उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

घरातील लोक मुला-मुलींचं वय 25 झालं की, त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावतात. घरातील वयोवृद्ध लोक अनेक उदाहरणं देत लवकर लग्न करण्याचा सल्ला देतात. पण आजच्या काळात उशिरा लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. ते काय हे जाणून घेऊया... 

आर्थिक स्थैर्य

वेळेनुसार तुमची आर्थिक स्थिती मजबूत झालेली असते. करिअरही ब-यापैकी सेट झालेलं असतं. वेळेनुसार तुमच्यात बराच समजूतदारपणाही आलेला असतो. वायफळ गोष्टींवर तुम्ही खर्च करणं टाळत असता. त्यामुळे तुमची बरीच बचत झालेली असते. 

परिपक्वता

काही लोकांना जबाबदारीची जाणिव ही वयासोबत नाहीतर वेळेनुसार होते. अशात तुमच्याकडे तुमच्यात आलेल्या समजूतदारपणाचा योग्य उपयोग करण्याची संधी असते. यावेळात तुम्ही तुमच्या भविष्याबाबत आणखी चांगल्याने विचार करु शकता.

स्वत:ला ओळखण्याची संधी

उशीरा लग्न करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते. तुम्हाला स्वत:कडून काय हवंय आणि दुस-यांकडून काय हवंय, याचं ब-यापैकी उत्तर मिळालेलं असतं. 

वेळेनुसार विचार बदलतात

वेळेनुसार व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल होत असतो याबाबत कुणाचही दुमत नसेल. 20व्या वर्षी जी गोष्ट तुम्हाला आवडायची ती 40 व्या वर्षीही आवडेलच हे गरजेचं नाही. पण वयाच्या एका वळणावर तुम्हाला लाईफबद्दल गंभीरतेने विचार करण्याची गरज असते. 

स्वप्न पूर्ण करण्याची संधी

जर तुम्ही उशीराने लग्न कराल तर तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. कुटूंबाच्या अडचणीमध्ये अडकण्याऐवजी तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष करिअर आणि स्वप्न पूर्ण करण्यावर केंद्रीत करु शकता.

Web Title: Advantages of getting married later in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.