७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:18 PM2019-06-25T13:18:07+5:302019-06-25T13:25:56+5:30

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीवर कोणताही विचार न करता व्यक्त होतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की, ही स्थिती आपण अधिक चांगल्याप्रकारे हॅन्डल केली असती.

This 72 hour rule can sort out all your love life problems | ७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!

७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!

Next

(Image Credit : Goalcast)

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या गोष्टीवर कोणताही विचार न करता व्यक्त होतो आणि नंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की, ही स्थिती आपण अधिक चांगल्याप्रकारे हॅन्डल केली असती. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. रिलेशनशिपमध्ये खूप चढउतार असतात. गैरसमजांमुळे अनेकदा भांडणं होतात. पण चिडचिड करून समस्या सुटत नसते. समस्या ही शांतपणे विचार करून सोडवून रिलेशनशिप व्यवस्थित ठेवलं जाऊ शकतं. अशात तुम्ही एक ७२ तासांचा नियम पाळून तुमच्या रिलेशनशिपमधील अडचणीची स्थिती व्यवस्थित हाताळू शकता.

काय आहे ७२ तासांचा नियम

हा एक फारच साधा नियम आहे. जर तुमचा पार्टनरसोबत काही गोष्टींवरून वाद झाला असेल तर त्यावर लगेच चिडून किंवा संतापून रिअ‍ॅक्ट होऊ नका. काहीही व्यक्त न होता तुमची रिअ‍ॅक्शन थांबवून ठेवा. तुमची ही रिअ‍ॅक्शन साधारण ७२ तासांसाठी थांबवून ठेवा.  
 

याने प्रतिसाद द्याल प्रतिक्रिया नाही

(Image Credit : wellsanfrancisco.com)

७२ तास वाट बघून तुम्हाला नेमका काय रिप्लाय द्यायचाय याचा विचार करायला पुरेसा वेळ मिळेल. त्यात तुम्ही स्थितीचा व्यवस्थित सगळ्या बाजूने विचार करू शकाल. तेव्हाच रिअ‍ॅक्शन द्याल तर तो तुमचा संताप असेल प्रतिक्रिया नाही. याने स्थिती आणखी बिघडू शकते.

स्वत:ला विचारा, ७२ तासांनी फरक पडणार का?

(Image Credit : USA Heral)

तुमची/पार्टनर तुम्हाला न आवडेल असं काही बोलले किंवा वागले का? मग स्वत:ला हा प्रश्न विचारा की, ७२ तासांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्यासाठी महत्त्वाची असेल का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ७२ तास थांबाच. शांत व्हा, विचार करा आणि दोघांचाही मूड नॉर्मल असेल तेव्हा त्यावर बोला.

एक्सपर्ट्स काय सांगतात?

(Image Credit :The Cheat Sheet)

'Kickstart Your Relationship Now! Move On or Move Out', या पुस्तकात लेखक मार्गोट इ ब्राउन जे एक मॅरेज फॅमिली थेरपिस्ट आहेत. त्यांनी सांगितले की, ते अनेकांशी या नियमाबाबत बोलले. अनेक कपल्स हा नियम फॉलो करतात आणि याचा त्यांना फायदा होतो. जर त्यांना त्या भांडणावर काहीच बोलायचं नसेल ते विषय सोडूनही देऊ शकतात.

चर्चा कराल तेव्हा....

(Image Credit : RePose Therapy)

लेखकाने सूचना दिली आहे की, चर्चा करताना योग्य शब्दांचा वापर केल्याने फार फरक पडतो. पार्टनरला केवळ दोष देऊन किंवा लेक्चर देऊन समस्या सुटणार नाही. तुमचं म्हणनं साध्या शब्दातही मांडू शकता.

आधी नेमका प्रॉब्लेम समजून घ्या

(Image Credit : Cooperative Ther)

आधी हे नेमका प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्या आणि तेव्हाच यावर योग्य ते सोल्यूशन निघू शकेल. तसेच या विषयावर पुन्हा रागाने व्यक्त होणार नाही याची काळजी घ्यावी. पुन्हा एकदा विश्वास उभा करा आणि नातं मजबूत करा.

Web Title: This 72 hour rule can sort out all your love life problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.