वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

By admin | Published: April 25, 2017 10:55 PM2017-04-25T22:55:04+5:302017-04-25T22:55:04+5:30

परिवहन महामंडळ : १९ कोटी २३ लाखांचे यंदा कमी उत्पन्न

Wadapa fast; ST recurring hurdles still persisted | वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

Next



रत्नागिरी : बंद झालेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या, बेसुमार अवैध वाहतूक व्यवसाय यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. सहन करावा लागत आहे. गतवर्षी हाच तोटा २ कोटी १७ लाख इतका होता. आता तो तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांवर गेला आहे.
ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ असे संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने शटल फेऱ्यांची सुविधा सुरू केली आहे. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जाऊन एस. टी. पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एस. टी. धावत असल्यामुळे एस. टी.चे नुकसान होत आहे. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळाला भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यावर्षी महामंडळाने दिवाळीच्या सुटीत काही दिवसांपुरती हंगामी भाडेवाढ केली होती. रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. याशिवाय ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक करण्यात आली. तसेच निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसमारंभ यामुळे एस. टी.ला उत्पन्न प्राप्त होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक वाढत असतानाच महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागत आहे. शिवाय आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने शटल फेऱ्या सुरु केल्या आहेत. मात्र अजूनही सर्वच भागांमध्ये अवैध वाहतुकीचे प्रमाण खूप मोठे असून, त्यामुळेच एस. टी. महामंडळ सातत्याने तोट्यात जात आहे.
सन २०१६ - १७मध्ये रत्नागिरी विभागाला २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दापोली आगाराला ३१ कोटी ३९ लाख ६० हजार, खेड आगारास ३१ कोटी ४६ लाख ६० हजार, चिपळूण आगारास ४४ कोटी २७ लाख ३२ हजार, गुहागर आगारास २६ कोटी २ लाख २४ हजार, देवरुख आगारास २७ कोटी ७३ लाख ४५ हजार, रत्नागिरी आगारास ५३ कोटी ७० लाख ८५ हजार, लांजा आगारास १६ कोटी ४० लाख ४७ हजार, राजापूर आगारास १७ कोटी ४१ हजार ८, मंडणगड आगारास १२ कोटी ८१ लाख ५५ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
गतवर्षी दापोली आगाराला ३४ कोटी ५० लाख ३६ हजार, खेड आगाराला ३३ कोटी ३१ लाख ७४ हजार, चिपळूण आगाराला ४६ लाख ५७ लाख ३५ हजार, गुहागर आगाराला २८ कोटी २७ लाख ५३ हजार, देवरूख आगाराला २९ लाख ५५ हजार, रत्नागिरी आगाराला ५६ कोटी ९२ लाख २६ हजार, लांजा आगाराला १८ कोटी ३५ लाख ८३ हजार, राजापूर आगाराला १९ कोटी ९२ लाख ६८ हजार, मंडणगड आगाराला १३ कोटी ९५ लाख ८० हजाराचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
बारटक्के : लांब पल्ल्याच्या गाड्या बंद
रत्नागिरी विभागाला २०१६-१७मध्ये २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त.
४गतवर्षी २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न.
गतवर्षी विभागाच्या उत्पन्नात २ कोटी १७ लाखांची घट.
यावर्षी तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांची घट सोसावी लागतेय.
महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागतोय.

Web Title: Wadapa fast; ST recurring hurdles still persisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.