Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 11:08 AM2019-07-03T11:08:57+5:302019-07-03T11:15:50+5:30

आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Tiware Dam ratnagiri Breached administration delayed funds for repairing | Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते

Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते

रत्नागिरी: तिवरे धरण फुटल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये 24 जण वाहून गेले. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं 13 घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता असता.

तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. खासदार विनायक राऊत यांनी त्याची दखल घेत या कामाकडे लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यावेळी माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न झाला. धरण दुरूस्तीसाठी निधीचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला होता. तो निधी वेळेत मिळाला असता तर, सर्व ग्रामस्थांचे प्राण वाचले असते.

तिवरी धरण २0१२ साली बांधून पूर्ण झाले. २.४५२ दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे. या धरणाची दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाकडून त्यासाठी निधीही मागणी करणारा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे खासदार विनायक राऊत यांनी पाटबंधारे खात्याला धरण दुरूस्तीच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांमुळे पाटबंधारे खात्याकडून दोन डंपर माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चार दिवसांच्या पावसाने ही डागडुजीही कमकुवत ठरवली. आता या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 
 

Web Title: Tiware Dam ratnagiri Breached administration delayed funds for repairing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.