सह्याद्रीच्या कपारीत रंगले मार्लेश्वरचे शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:56 PM2019-01-15T20:56:26+5:302019-01-15T20:57:15+5:30

‘गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा...’ या मंजुळ स्वराबरोबरच ढोल- ताशे, सनई चौघडे, ‘हर हर मार्लेश्वर’, ‘शिव हरा शिव हरा’ च्या गजराने सह्याद्र्री पर्वत रांगा मंगळवारी दुमदुमून निघाल्या.

Shubhamangal of Marleshwar | सह्याद्रीच्या कपारीत रंगले मार्लेश्वरचे शुभमंगल

सह्याद्रीच्या कपारीत रंगले मार्लेश्वरचे शुभमंगल

Next

देवरूख  - ‘गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा...’ या मंजुळ स्वराबरोबरच ढोल- ताशे, सनई चौघडे, ‘हर हर मार्लेश्वर’, ‘शिव हरा शिव हरा’ च्या गजराने सह्याद्र्री पर्वत रांगा मंगळवारी दुमदुमून निघाल्या. औचित्य होते, सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर स्वयंभू देव व साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्नसोहळा) सोहळ्याचे! हा अभूतपुर्व सोहळा हिंदू लिंगायत पध्दतीने दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या शुभमुहुर्तावर मानकरी व राज्यातील हजारो भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात पार पडला. 

या विवाह सोहळ्याला गोठणे गावची करवली नटून थटून आली होती. साखरपा येथील वधू गिरीजा देवीची पालखी, मार्लेश्वराची पालखी व सोहळ्याचे यजमान देवरूख येथील वाडेश्वर, मानकरी, पालख्या ,दिडींचे व  वºहाड मंडळींचे सोमवारी रात्रौ मार्लेश्वर पवई येथे आगमन झाले होते. त्यांचे मंगळवारी सकाळी विवाहस्थळी स्वागत करून ३६० मानकºयांच्या उपस्थितीत कल्याण विधीचा प्रारंभ के ला गेला. धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दुपारी १ वाजता श्री मार्लेश्वर देवाला हळद चढवून कल्याणविधी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. 

हा विवाह सोहळा धार्मिक विधीनुसार मार्लेश्वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्यक असते व याची यावेळीही काळजी घेण्यात आली होती. या सोहळ्यात मंगलाष्टका या पौराहित्य करणाºयांनी म्हटल्या. शेवटची मंगलाष्टका कल्याणविधी सोहळ्यासाठी उपस्थित वºहाडी मंडळींनी सामुहिक पणे म्हणून हा सोहळा यादगार केला. यानंतर ‘शिव हरा रे शिव हरा’ हर हर मार्लेश्वर, गिरीजा माते की जय असा एकच जयघोष करण्यात आला. या सोहळ्यानंतर वधू वरांस आहेर देण्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी हजारो भाविक मारळ नगरीत दाखल झाले होते. 

या सोहळयाप्रसंगी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, आमदार सदानंद चव्हाण,  शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र्र महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्या नेहा माने, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, मुग्धा जागुष्टे, माजी जिल्हा परिषद सदस्या वेदा फडके, पंचायत समिती सभापती सोनाली निकम, उपसभापती अजित गवाणकर, प्रसाद सावंत, कोंडगाव सरपंच बापु शेट्ये यांसह मार्लेश्वर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, वर व वधू कडील सर्व मंडळी व राज्यातून आलेले हजारो भाविक हजर होते. रात्रौ साक्षी विडे भरून या सोहळ्याची सांगता झाली. 

Web Title: Shubhamangal of Marleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.