रिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजी, पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:32 PM2018-07-07T17:32:57+5:302018-07-07T17:36:36+5:30

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते.

Shivsena's sloganeering from refinery, blowing the trumpet in the monsoon session | रिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजी, पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

रिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजी, पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

googlenewsNext
ठळक मुद्देरिफायनरीवरून शिवसेनेची घोषणाबाजीपावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले

राजापूर : नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्रातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मारुन केंद्र व राज्य शासनाने लादलेल्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू, राजापूरचे आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, डॉ. सुजित मणचेकर, प्रकाश आंबिटकर, प्रताप सरनाईक, ज्ञानराज चौगुले, प्रकाश फाफरतेकर, तुकाराम काते, अजय चौधरी, सुरेश गोरे, तृप्ती सावंत व कोकणसह राज्यातील सेना आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

यानंतर सेना प्रतोद आमदार सुनील प्रभू व आमदार राजन साळवी यांनी कोकणच्या माथी प्रकल्प लादणाºया शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवसेना सदैव जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी ठाकली आहे. ह्यनाणार प्रकल्प रद्द होत नाही, तोवर आम्ही गप्प बसणार नाहीह्ण, ह्यशासनाची दडपशाही चालू देणार नाही, रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजेह्ण अशा शब्दात शिवसेनेच्या आमदारांनी मते मांडली.

भास्कर जाधवही आले

शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधवदेखील सहभागी झाले होते. भास्कर जाधव यांच्या सहभागामुळे भास्कर जाधव आणि शिवसेना याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Shivsena's sloganeering from refinery, blowing the trumpet in the monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.