रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:06 PM2018-02-27T14:06:04+5:302018-02-27T14:06:04+5:30

रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.

Ratnagiri: In the 8 days of water planning, Uday Samant, the testimony of Rahul Pandit | रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी शहरात कोकणातील पहिला नाना-नानी पार्क उभारणारशहरात घनकचरा प्रकल्प उभारणीचा प्रयत्न उदय सामंत, राहुल पंडित यांची - विचार मंथन २०१८ कार्यक्रमात ग्वाही

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यातर्फे शहरातील सर्वस्तरातील मान्यवरांना निमंत्रित करून वेध विकासाचा, रत्नागिरीच्या प्रगतीचा या विषयावरील विचारमंथन २०१८ कार्यक्रम रविवारी रात्री माळनाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

शहर विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी, सूचना व नवीन कल्पनांचे स्वागत करून त्यातील योग्य सूचना, कल्पना शहर विकासासाठी राबविण्याकरिता हा अभिनव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी नगरसेविका सुमिता भावे, ज्येष्ठ वकील बाबासाहेब परुळेकर, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.

या विचारमंथन उपक्रमात रत्नागिरी शहरातील अनेक विकासकामांबाबत उहापोह झाला. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील रखडलेली पाणी योजना हा अत्यंत संवेदनशील विषय होता. वर्षभरापूर्वी मंजूर होऊनही या योजनेच्या कार्यवाहीत काही अडथळे आले आहेत.

मात्र, येत्या आठवडाभरात याप्रकरणी कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होईल. या योजनेच्या कार्यवाहीतील सर्व अडथळे दूर होऊन येत्या आठवडाभरानंतर काम सुरू होईल, अशी ग्वाही यावेळी आमदार सामंत व नगराध्यक्ष पंडित यांनी उपस्थितांना दिली.

रत्नागिरी शहरातील विविध विकासप्रश्नांबाबतच्या या विचारमंथन कार्यक्रमात मान्यवरांनी आपली परखड मते मांडली. कचऱ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषदेतर्फे जो स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम सुरू आहे, त्यानुसार पुढे कायम कचरा संकलनाची व्यवस्था राबविण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली.

रत्नागिरी शहरातील पदपथांवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे लोकांनी चालावे कूठून असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे उठवून व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ (फूटपाथ) उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची सूचना पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केली.

शवदाहिनी डिझेवरील असावी

रत्नागिरी शहरात शवदाहिनी ही डिझेलवरील असावी, अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन कार्यक्रमात मांडली. डॉक्टर्स संघटनेतर्फेही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शवदाहिनी उभारण्याचा याआधीही प्रयत्न झाला. मात्र, परंपरेचा मुद्दा पुढे आल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

वनौषधी प्रकल्प होणार

रत्नागिरी शहरात वनौषधींचा पथदर्शी प्रकल्प व्हावा, अशी संकल्पना मांडताना हा प्रकल्प व्हावा यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रयत्न केले होेते. वनौषधी कोणत्या, त्यांचा उपयोग काय, याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. हा वनौषधी प्रकल्प येत्या वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरात साकार होईल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत यांनी यावेळी दिली.

Web Title: Ratnagiri: In the 8 days of water planning, Uday Samant, the testimony of Rahul Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.