मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:01 AM2018-05-06T06:01:15+5:302018-05-06T06:01:15+5:30

परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.

 Not yet mangoes export through Mangontan | मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

Next

रत्नागिरी  - परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.
गतवर्षी मँगोनेट प्रणालीतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ हजार ८४ शेतकºयांनी मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी झाली होती. यावर्षी चिपळूण तालुक्यातील ३ व गुहागर तालुक्यातील २ मिळून एकूण ५ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. शेतकºयांच्या अल्प प्रतिसादामुळेच दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. गतवर्षी थेट रशिया व कुवेतसाठी आंबा निर्यात करण्यात आला होता. अनिकेत हर्षे (नेवरे), डॉ.खलिफे (राजापूर), सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांनी आंबा निर्यात करण्याचा मान पटकाविला आहे. यावर्षी मँगोनेटद्वारे जिल्ह्यातून एकही आंबा निर्यात करण्यात आलेला नाही.

जुन्या निकषांद्वारेच प्रक्रिया सुरू
हापूसची साल पातळ आहे. परंतु ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी अशी सूचना करण्यात आली होती. याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल पुढे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे जुन्या निकषांद्वारेच आंब्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Web Title:  Not yet mangoes export through Mangontan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.