चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:35 AM2019-04-20T11:35:04+5:302019-04-20T11:36:18+5:30

चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे

Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work | चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

Next
ठळक मुद्देग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवेलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे

खेर्डी : चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच खेर्डी येथे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते.

औद्योगिक वसाहत असल्याने या भागात अवजड वाहतूक अधिक आहे. त्यातच रस्त्याच्या कामामुळे  वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खेर्डीत बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी औद्योगिक वसाहत, खेर्डी रेल्वे पूल, बाजारपेठ याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सेवेलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.