आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन

By मनोज मुळ्ये | Published: April 8, 2024 05:44 PM2024-04-08T17:44:16+5:302024-04-08T17:44:44+5:30

रत्नागिरी : मतदानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन विविध पर्यायांचा वापर करत असून, क्रिकेटपटू प्रवीण आमरे व प्रसिद्ध निर्माता, ...

Actors Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar appealed to Ratnagirikar to vote | आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन

आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, सेलिब्रिटींचे रत्नागिरीकरांना आवाहन

रत्नागिरी : मतदानामध्ये वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन विविध पर्यायांचा वापर करत असून, क्रिकेटपटू प्रवीण आमरे व प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर यांनीही रत्नागिरीकरांनामतदानाचे आवाहन केले आहे.

नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर गेले अनेक दिवस रत्नागिरीमध्ये आहेत. त्यांनी चित्रिकरणादरम्यान वेळ काढून रत्नागिरीकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. त्याचा एक व्हिडिओ जिल्हा प्रशासनाकडून सर्वांना पाठवला जात आह. यात सुप्रिया पिळगावकर म्हणतात की, समस्त रत्नागिरीकर मंडळींना आमचा नमस्कार. मंडळी, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान, देहदान हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे, मतदान.

सचिन पिळगावकर म्हणतात की, संविधानानं आपल्याला दिलेला हक्क, अधिकार, कर्तव्य बजावून आपल्याला देशाची सेवा केलीच पाहिजे. समस्त रत्नागिरीकरांना आमचं आवाहन आहे की ७ मे रोजी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा. या दिवशी वेळात वेळ काढून मतदान करा. लक्षात ठेवा आधी मतदान आणि मग बाकी सर्व काम, असे आवाहन या सेलिब्रिटी जोडप्याने केले आहे.

लोकांच्या मनावर चित्रपट आणि क्रिकेटचा खूप मोठा पगडा असतो. त्यांचे अनुकरण करणं हा ट्रेंडच आहे. नेमका हाच धागा पकडून प्रशासनाने लोकांना मतदानाबाबत जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.

येत्या ७ मे रोजी लोकसभेची निवडणूक होत आहे. जगात सर्वात मोठी असणाऱ्या आपल्या भारतीय लोकशाहीचा हा उत्सवच आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. तुमच्या प्रत्येकाच्या एक-एक मताने आपली लोकशाही आधिक बळकट होणार आहे. या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदार नेहमी आग्रेसर असतात. त्यांचा हाच आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या बरोबरीने आपण सर्वजण मतदान करुया..! - प्रवीण आमरे, निवृत्त भारतीय क्रिकेटपटू

Web Title: Actors Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar appealed to Ratnagirikar to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.