रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:49 PM2018-10-12T23:49:38+5:302018-10-12T23:52:07+5:30

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, ...

 Will Ramraj's corruption be investigated? Instructions given to GD Development Officer | रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

रामराजमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ?; गटविकास अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश

Next

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासकीय दरबारी गाºहाणे मांडले होते, तसेच त्याबाबतचा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने घेत रामराजच्या कारभाराची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये दोषी आढळल्यास थेट कारवाईचे निर्देश गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्याने सरपंच आणि ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
अलिबाग तालुक्यात रामराज ग्रामपंचायत आहेत. गावातील विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही, १४ व्या वित्त आयोगाचा निधी कोणत्या विकासकामांवर किती प्रमाणात खर्च केला, त्याचा ठेकेदार कोण होता याची माहिती ग्रामस्थांनी ग्रामसभेत मागितली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली होती. सातत्याने माहिती मागूनही माहिती देण्यात येत नव्हती. मागील तीन वर्षातील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करत आहेत. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर, काही घरकूल न उभारताच निधीचा गैरवापर केल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. त्याचप्रमाणे गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले होते. या प्रकरणी सदस्य नदीम बेबन यांच्यासह ग्रामस्थ संदीप पालकर यांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कारभाराला कंटाळून त्यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. तसेच त्याबाबतची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली होती. राज्यपालांकडे थेट तक्रार दाखल झाल्याने प्रशासनही आता खडबडून जागे झाले आहे. त्यांनीही आता तक्रारीचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. रामराजच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुंड यांनी दिले आहेत.

ग्रामस्थ सातत्याने तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने सरपंच आणि ग्रामस्थ कोणालाच जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाने सत्य
बाहेर येणार आहे.
-नदीम बेबन,
सदस्य, रामराज ग्रामपंचायत

Web Title:  Will Ramraj's corruption be investigated? Instructions given to GD Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड