मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा, २००१ पासून क्रीडा धोरण कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:44 PM2019-05-03T23:44:21+5:302019-05-03T23:45:08+5:30

ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी

Waiting for playground in Murud taluka, on 2001, on Sports Policy paper | मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा, २००१ पासून क्रीडा धोरण कागदावर

मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा, २००१ पासून क्रीडा धोरण कागदावर

Next

संजय करडे

मुरुड : ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २००१ पासून क्रीडा धोरण आखून विशेषत्वाने तालुका क्रीडांगण उभारण्याचा निर्णय घेतला. या धोरणान्वये मुरुड तालुक्यातील विहूर हे क्रीडा संकुल गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे.

मुरुड नजीकच्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील एक हेक्टर जागेत तत्कालीन राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते १० मे २०१३ भूमिपूजन झाले होते. एक कोटी रुपयांची तरतूदही बजेटमध्ये झाली होती. क्रीडा संकुलाकडे जाण्यासाठी रस्ता तसेच डोंगराळ जमिनीच्या सपाटीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता भासेल, असे तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुरोगामी राज्यात ११ जिल्ह्णात क्रीडा प्रबोधिनी स्थापन झाल्या असून, रायगड जिल्ह्णातही प्रबोधिनी कार्यान्वित व्हावी. लोकप्रतिनिधींनी मुरुडसारख्या ग्रामीण डोंगरी भागात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

अलीकडे प्रत्येक जिल्ह्णात क्रीडा संकुल उभारण्याची जोरदार तयारी सुरू असून क्रीडा क्षेत्रावर राज्य शासनाने फोकस केल्याचे दिसत असले तरी तालुकास्थानी क्रीडा संकुलच अस्तित्वात नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे अवघड वाटते. मुरुड नगरपरिषद पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर यांनी मुरुडमध्ये मेहनती खेळाडू आहेत; परंतु क्रीडांगण उपलब्ध नाही. नगर परिषदेच्या माध्यमातून वसंतराव नाईक कॉलेजच्या जवळ सुमारे तीन एकर खासगी जागा आरक्षित आहे. त्या जागेवर प्रस्ताव मंजुर झाल्यास मुरुड नगर परिषद चटई क्षेत्राच्या ४० टक्के वाढीव बांधकामाला भूखंडधारकांना परवानगी देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगून स्वत: क्रीडा शिक्षक म्हणून या विषयात लक्ष पुरविणार असल्याचे स्पष्ट केले.

मुरुड शहरात जागा आरक्षित करणार, असे गेल्या कित्येक वर्षांपासून सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात क्रीडांगणासंबंधी कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यामुळे मुरुड तालुक्यातून उत्तम दर्जाचे क्रीडापटू तयार होत नसल्याची खंत अनेक क्रीडापटू यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Waiting for playground in Murud taluka, on 2001, on Sports Policy paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.