रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलींनीच मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:46 PM2018-06-08T14:46:20+5:302018-06-08T14:46:20+5:30

रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.४८ टक्के लागला आहे.

SSC result : Raigad's SSC results were 9.83 percent, and the girls got beaten | रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलींनीच मारली बाजी 

रायगडचा एसएससी निकाल ८९.३७ टक्के, मुलींनीच मारली बाजी 

Next

जयंत धुळप /अलिबाग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परिक्षेचा  शुक्रवारी जाहिर झालेल्या आॅनलाईन निकालानुसार रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.४९ टक्के तर मुलांचा निकाल ८७.४७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण ३६ हजार ५४९ नाेंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी हाेते. त्यापैकी ३६ हजार ४३५ विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेस बसले हाेत. त्यापैकी ७ हजार१२२ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ११ हजार२९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत. १० हजार ९१७ द्वीतीय श्रेणीत तर ३ हजार२३० उत्तीर्ण श्रेणीत असे एकुण ३२ हजार ५६१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.


रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२.४८ टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांत कर्जत-८४.९९टक्के, उरण-८८.३२ टक्के, खालापूर-८६.८०  टक्के,सुधागड-८४.५१,पेण-९०.७२टक्के,अलिबाग-८७.७३टक्के,मुरुड-८९.२६टक्के,राेहा-९०.०७टक्के,माणगांव-९१.३०टक्के,तळा-८२.९९टक्के,श्रीवर्धन-८२.७३टक्के,म्हसळा-८९.६८टक्के, महाड-८९.४९टक्के,पाेलादपूर-८९.८०टक्के निकाल लागला आहे.
 

Web Title: SSC result : Raigad's SSC results were 9.83 percent, and the girls got beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.