श्रीवर्धनमध्ये पाणीप्रश्न गंभीर, मुबलक पाऊस न पडल्याने समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:39 AM2019-02-09T03:39:37+5:302019-02-09T03:40:05+5:30

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी श्रीवर्धन तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला त्यामुळे तालुक्यातील धरणात मुबलक प्रमाणात पाणी संचय झालेला नाही.

Srivardhan has water problems, severe problem due to lack of rain | श्रीवर्धनमध्ये पाणीप्रश्न गंभीर, मुबलक पाऊस न पडल्याने समस्या

श्रीवर्धनमध्ये पाणीप्रश्न गंभीर, मुबलक पाऊस न पडल्याने समस्या

Next

- संतोष सापते

श्रीवर्धन  - गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी श्रीवर्धन तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला त्यामुळे तालुक्यातील धरणात मुबलक प्रमाणात पाणी संचय झालेला नाही. परिणामी, तालुक्यातील जनतेच्या पेयजलाचा प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पशुधन, शेती व पर्यटन या तिन्ही बाबींवर याचा परिणाम झाला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरण शहर व जवळपासच्या खेडेगावासाठी महत्त्वाचे आहे. रानवली धरणाची पाणी साठवण क्षमता २.२५ दशलक्ष घनमीटरच्या सुमारास आहे. श्रीवर्धन शहरासाठी आरक्षित पाणीसाठा ४८ दशलक्ष आहे. आराठी, जसवली या ग्रामपंचायती व श्रीवर्धन नगरपालिका हद्दीतील सर्व रहिवाशांना रानवली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात नगरपालिका हद्दीत ८७.९४ इंच पाऊस पडला होता. श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीत ४९०० घरे असून, श्रीवर्धन शहराची लोकसंख्या १५५२० च्या जवळपास आहे. शासन नियमानुसार दरडोई १३५ लीटर पाण्याची तरतूद आहे. प्राप्त माहितीनुसार चार कोटी १४ लाख लीटर पाणी रानवली धरणात शिल्लक आहे, त्यामुळे उपलब्ध पाणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरवण्याचे दिव्य नगरपालिका प्रशासनास करणे कठीण ठरणार आहे.

श्रीवर्धन शहर व तालुक्यातील पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोत निष्क्र ीय ठरत आहेत. शहरात सार्वजनिक ३५ विहिरी असून, सर्वांनी आताच जवळपास तळ गाठला आहे. श्रीवर्धन प्रवेशद्वारा जवळ भुवनाळे तलाव, जसवली फाट्याच्या लगत जसवली तलाव, भोस्ते तलाव व नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील बाजूस उजाड अवस्थेत तलाव आहे; परंतु या चारही तलावाचा काहीच उपयोग व वापर नाही. तालुक्यातील खेडे गावातील व वाड्यावस्त्यांवरील विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. अनेक विहिरी दुर्लक्षित आहेत, त्यामुळे स्वच्छ व निरोगी पाणी मिळणे कठीण आहे. खेडेगावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत गंजत पडलेले आहेत. चालू हातपंपातून पाणी उपलब्ध होणे कठीण व कष्टाचे काम आहे. याचबरोबर गुरांसाठी चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. भात कापणीनंतर शेत उजाड झाली आहेत. लोकांना रोजगारनिर्मितीचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने तरु ण पिढीची उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे धाव घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

श्रीवर्धन नगरपरिषद पाणीप्रश्नी सजग व जागृत आहे. आम्हाला आशा आहे की साधारणत: रानवली धरणातील पाणीपुरवठा पावसाळ्याच्या कालावधीपर्यंत पुरेल अन्यथा त्या प्रश्नी तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- किरणकुमार मोरे,
मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषद

श्रीवर्धन तालुक्यात यावर्षी पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे तालुक्यात पाणीप्रश्नी टँकरची मागणी करणाºया गावांना तत्काळ पुरवठा केला जाईल. पाणीप्रश्नी प्रशासन संवेदनशील आहे.
- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, श्रीवर्धन

श्रीवर्धन पंचायत समितीने पाणीप्रश्नी आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे, त्यास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांना तत्काळ पाणीपुरवठा करण्याची तरतूद केली जाईल.
- मंगेश कोबनाक, पंचायत समिती सदस्य, श्रीवर्धन

दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने त्या संदर्भात आराखडा तयार आहे. रानवली धरणातून पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी उपाययोजना तयार असतील. नागरिकांना पाणीविषयी त्रास होणार नाही.
- नरेंद्र भुसाने, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषद

दुष्काळी परिस्थितीमुळे नैसर्गिक स्रोतामध्ये कमालीची घट झाली आहे. नगरपालिका प्रशासन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती आहे.
- दर्शन विचारे,नगरसेवक

अपेक्षित पाऊस न पडल्याने समस्या

गतवर्षी एप्रिल महिन्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तालुक्यातील साक्षी भैरी (हरेश्वर), वडशेतवावे, गुलदे (कासार) कोंड, शेखार्र्डी या गावांना गेल्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

यावर्षी तालुक्यात २३०१ मिली मीटर पाऊस पडला आहे. श्रीवर्धन तालुक्यात अपेक्षित पाऊस ३२१८ आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाईचे संकट लवकरच निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Web Title: Srivardhan has water problems, severe problem due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.