श्रीवर्धन समुद्रकिना-याला पसंती; दिवेआगर हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:01 AM2017-12-26T03:01:27+5:302017-12-26T03:01:29+5:30

बोर्ली पंचतन : नाताळ सणाची सुट्टी व सलग तीन दिवस सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिना-याला पसंती दिली आहे.

Selection of Shrivardhan beach; Divayagar HousesFull | श्रीवर्धन समुद्रकिना-याला पसंती; दिवेआगर हाऊसफुल्ल

श्रीवर्धन समुद्रकिना-याला पसंती; दिवेआगर हाऊसफुल्ल

googlenewsNext

बोर्ली पंचतन : नाताळ सणाची सुट्टी व सलग तीन दिवस सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिना-याला पसंती दिली आहे. यामुळे श्रीवर्धन तालुका पर्यटकांनी हाउसफुल्ल झाला. सुवर्णगणेश दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहरातील सर्व लॉजिंग्स फुल्ल झाल्याने अचानक निघालेल्या पर्यटकांना म्हसळा येथील लॉजिंगमध्ये तर काहींना माणगावच्या रिसॉर्टचा आश्रय घ्यावा लागला. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, कोंडविल येथील समुद्रकिनारेही गजबजले आहेत.
पर्यटकांना समुद्रातील बोट सफर, सँड बाइक, घोडेस्वारी, उंटावरील सैर, थंडीचा मोसम असूनही समुद्रामध्ये डुंबण्याचा आस्वाददेखील घेण्याचे सोडले नाही. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बहुतांश पर्यटकांनी गैरसोय टाळण्याकरिता आगाऊ बुकिंग महिनाभर अगोदरच केली होती. दिवेआगरच्या समुद्रकिनाºयावर तसेच सुवर्णगणेश मंदिर येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर सर्व प्रकारची मच्छी भरडखोल, बोर्लीपंचतन येथील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने खवय्यांची चंगळ झाली, तर शाकाहारी मंडळींनीदेखील उकडीच्या मोदकावर ताव मारला.
>असंख्य वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. मेट्रो, उड्डाणपूल व ठिकठिकाणी चाललेली रस्त्यांची कामे व सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे सर्व जण बाहेर पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. बोरीवलीहून दुपारी २.३० वाजता निघालेली गाडी तब्बल ७ वाजता नेरूळ येथे पोचली. दीड तासाच्या ३० ते ३५ किलोमीटरच्या अंतरासठी साडेचार तास लागले. तर पनवेल-पळस्पे, वडखळ, कोलाड-माणगाव रस्ता खराब असल्याने नेहमीची वाहतूककोंडी टाळण्यासाठी खोपोलीमार्गे द्रुतगती मार्गाने पाली येथे यावे लागले व २१३ रुपयांचा टोलचा भुर्दंड सोसावा लागला असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक नितीन बढेकर यांनी व्यक्त के ली.

Web Title: Selection of Shrivardhan beach; Divayagar HousesFull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.