दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:00 AM2018-08-25T02:00:51+5:302018-08-25T02:01:21+5:30

देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.

Responsibility for the society to enable Divya: Nitin Gadkari | दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

Next

वडखळ : देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.
पेण येथील एम्पथी फाउंडेशन मुंबई यांनी बांधलेली नूतन इमारत सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांची शाळेचे उद्घाटन व ए.डब्ल्यू.एम.एच. महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रवि पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, एम्पथी फाउंडेशनचे रमेश दमाणी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
दिव्यांगांना समाजाचे समर्थन मिळाले पाहिजे त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले तरच ते आत्मविश्वासाने जगू शकतील, समाजातील सदृढ लोकांनी त्यांच्याबाबत सहनशीलतेचे भान ठेवून त्यांना मदत करणे कर्तव्य मानले पाहिजे, असे विचार गडकरी यांनी मांडले.
या वेळी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या तर्फे या शाळेला एक कोटी रु पयांचा मदतनिधी देत असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या विद्यार्थिनींनी नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व उपस्थित मान्यवरांना बांधल्या.

Web Title: Responsibility for the society to enable Divya: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.