समुद्र संरक्षण बंधा-यांची दुरुस्ती करा, दुरुस्तीमुळे १३५० एकर भातशेतीचे होणार रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:48 AM2017-12-27T02:48:53+5:302017-12-27T02:48:54+5:30

अलिबाग : सागरी उधाणामुळे जुई अब्बास खारभूमी योजनेतील खारढोंबी योजनेतील ‘खारढोंबी’ व ‘माचेला’ येथील बाहेरकाठा(समुद्र संरक्षक बंधारा)स भगदाडे पडली.

Repair of sea protection bonds, repair of 1350 acres of paddy by repair | समुद्र संरक्षण बंधा-यांची दुरुस्ती करा, दुरुस्तीमुळे १३५० एकर भातशेतीचे होणार रक्षण

समुद्र संरक्षण बंधा-यांची दुरुस्ती करा, दुरुस्तीमुळे १३५० एकर भातशेतीचे होणार रक्षण

googlenewsNext

जयंत धुळप 
अलिबाग : सागरी उधाणामुळे जुई अब्बास खारभूमी योजनेतील खारढोंबी योजनेतील ‘खारढोंबी’ व ‘माचेला’ येथील बाहेरकाठा(समुद्र संरक्षक बंधारा)स भगदाडे पडली. यामध्ये तब्बल ४१०० एकर भातशेतीचे नुकसान झाले. बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची तत्काळ दुरुस्ती करा, असे आदेश पेण उपविभागीय महसूल अधिकाºयांनी जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापन व खारभूमी सर्व्हेक्षण विभागाला दिले आहेत. वेळेत दुरुस्ती झाली तर १३५० एकर भातशेती जमिनीचे संरक्षण होणार आहे.
या परिसरात प्रस्थापित झालेल्या जेएसडब्ल्यू कंपनीने केलेल्या अतिप्रचंड व विस्तारित माती भरावामध्ये या परिसरातील पूर्वांपार असणारे नैसर्गिक नाले बुजविल्याने पर्यावरणीयदृष्ट्या याचे गंभीर परिणाम होऊन बाहेर काठे (संरक्षक बंधारे) फुटले आहेत. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू कंपनीने माचेला हद्दीत काही शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असल्याने पूर्वीपासून चालत आलेली जोळ पद्धत (सहकारातून बांधबंदिस्ती करण्याची पद्धत) मोडीत निघाल्याने हे शेतकरी बाहेर काठ्याच्या डागडुजीच्या कामाला जोळकरी म्हणून जात नाहीत. परिणामी, येथील संपूर्ण शेती व्यवस्थाच नष्ट झाली आहे.
शासनाचा खारभूमी योजनेकरिता बाहेरकाठा नूतनीकरण व दुरु स्तीसाठी निधी येत नसल्याने याचे दुष्परिणाम येथील शेतकºयाला भोगावे लागत आहेत. या संदर्भात गेल्या २५ मे २०१७ रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांचे उपोषण आंदोलन झाले होते. त्या वेळी झालेल्या सभेत पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेल्या आदेशाची कंपनी व खारभूमी खात्याने अंमलबजावणी केली नाही. परिणामी, गेल्या ४ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या मोठ्या सागरी उधाणाने याच सरक्षक बंधाºयास भगदाडे (खांडी) पडून १८०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरून शेतकºयांच्या वर्षभराच्या उभ्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. त्यानंतरच्या ३ डिसेंबर २०१७ रोजीच्या मोठ्या सागरी उधाणामध्ये या खांडीची (भगदाडांची) व्याप्ती वाढत गेल्याने आणखी २७०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी पेण उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्तसभेत ठरल्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी हे आदेश दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ता अरु ण शिवकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांच्या (खांडीच्या) संदर्भात झालेल्या संयुक्तिक पाहणी अहवालानुसार मौजे खारमाचेला येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या मागील गेट जवळील सरकारी जागेवर पाणी जाण्याच्या मार्गावर असलेल्या नाल्यावर तात्पुरते मोठे पाइप टाकून तात्पुरता पूल तयार करून खारबंदिस्तीचे काम करणे शक्य आहे. याकरिता लागणारी भरावमाती बांधावरून नेऊन जेएसडब्ल्यू कंपनी व खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग यांच्यामार्फत खांड दुरुस्तीची कार्यवाही समन्वयाने करावी, असे हे सुस्पष्ट आदेश असल्याचे शिवकर यांनी सांगितले.
>बुधवारी आनंदनगर येथे शेतकºयांची बैठक
पेण उपविभागीय महसूल अधिकारी पुदलवाड यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जुई, देवळी, खारपाले, ढोंबी, गडब परिसरांतील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले असून, या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता बुधवार, दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १ वाजता आनंदनगर येथे सर्व संबंधित शेतकºयांची बैठक सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, या बैठकीला आनंदनगर, देवळी, जुई, खारपाले, म्हैसबाड, मौजेपाले, ढोंबी, जांभेला, चिर्बी, खारघाट, माचेला व मौजे काराव येथील जोळकरी शेतकºयांनी हजर राहवे, असे आवाहन खार डोंगर मेहनत आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग तुरे यांनी केले आहे.
>शासनाचे आभार
दरम्यान, पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी २१ डिसेंबरला कंपनीला व खारभूमी खात्याला आदेश देऊन मागील वर्षापासून प्रत्येक मोठ्या उधाणाला हजारो एकरात खारे पाणी शिरून सुपीक भातशेती नापीक होण्यापासून वाचविण्याकरिता केलेल्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ता अरु ण शिवकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Repair of sea protection bonds, repair of 1350 acres of paddy by repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.