राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:07 PM2018-07-10T15:07:17+5:302018-07-10T15:17:01+5:30

300 फूट दरीत पडलेल्या दोघांना डोली करून सुखरूप बाहेर काढले

raja shivchatrapati parivar saves life of two trackers | राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान

राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान

googlenewsNext

कांता हाबळे, नेरळ

रायगड जिल्ह्यातील राजा शिवछत्रपती परिवाराने 9 जुलै रोजी कर्जत तालुक्यातील पेब किल्ल्यावर वृक्षारोपण व गडस्वच्छता मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम राबवत असताना त्यांना गडावरील मठातील माईकडून दोन ट्रेकर्स दरीत पडल्याचे समजले. हे समजताच राजा शिवछत्रपती परिवाराने क्षणाचाही विचार न करता दरीत उतरून दोघांना 300 फूट दरीतून सुखरूप बाहेर काढले आहे. 

रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक व ट्रेकर्स माथेरानजवळच्या पेब किल्यावर आले होते. ट्रेक करत असताना एक मुलगा व एक मुलगी दुपारी 3 च्या सुमारास दरीत कोसळली. काही वेळाने हे राजा शिवछत्रपती परिवारातील काही सदस्यांना कळाले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता २५० - ३०० फुट खोल दरित पडलेल्या त्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी धाव घेतली. शिवचरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लाकडाच्या काठ्या आणि साडीच्या सहाय्याने डोली बनवून प्रथम त्या डोलीत स्वतः बसून मग एकेकाला बाहेर काढण्यात आले. तब्बल ३-४ तासानंतर या बचावकार्याला यश आले.

गडावर सुमारे ५००-६०० पर्यटक व ट्रेकर्स उपस्थित होते. घळईतून दोघांना बाहेर काढत असताना तिथे बघ्यांची एकच झुंबड उडाली होती. तसेच या गर्दीमुळे ६ मुली आणि १ मुलगा गडावर फिरण्यासाठी आलेले असताना आपल्या भावांपासून दुरावले होते. अंधारही पडला होता. त्या सर्व खुपच घाबरल्या होत्या. त्या मुलींनी आम्हाला आमच्या भावांपर्यंत पोहचवा अशी शिवछत्रपती परिवाराकडे विनवणी केली. परिवारातील मावळ्यांनीही " परस्त्री माते समान " हा छत्रपती शिवरांयाचा आदर्श घेत त्या मुलींना नेरळ रेल्वे स्टेशनला त्यांच्या भावांकडे रात्री ०९ : ३० वा. सुखरुप पोहोच केले. त्यानंतर सर्व भावांनी परिवारातील मावळ्यांचे तोंड भरुन कौतुक आणि आभार मानले.

या बचावकार्यात सहभागी झालेले राजा शिवछत्रपती परिवारातील रायगड विभागाचे अक्षय पाटील, कल्पेश म्हसे, किरण भोईर, जयेश भोईर, राकेश कवाडकर, जगदिश, विशाल खुणे, धिरज पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.


 

Web Title: raja shivchatrapati parivar saves life of two trackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.