Raigad: परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 05:57 PM2023-09-05T17:57:38+5:302023-09-05T17:58:31+5:30

Raigad News: वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी  (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले.

Raigad: The respect for teachers abroad is not seen in our country - Veer Wajekar | Raigad: परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर

Raigad: परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर

googlenewsNext

- मधुकर ठाकूर
उरण  - वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी  (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले. प्रा.गजानन चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व गुरू यांच्यामधील मूलभूत फरक सांगितला. आजच्या शिक्षणव्यवस्थेविषयी वास्तव चित्रही मांडले.

परदेशात शिक्षकांविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही. शिक्षक खऱ्या अर्थाने समाज जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलत असतो.राष्ट्र विकासात शिक्षकांचे स्थान खूप मोठे आहे.मात्र आज शिक्षक आणि शिक्षण व विद्यार्थी यांचे भवितव्य काही चांगले नाही अशी खंत प्रा.बळीराम पवार यांनी व्यक्त केली.

राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.संदीप घोडके यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक आणि त्याची विद्यार्थी प्रती असणारी तळमळ व्यक्त केली.शिक्षक हा खऱ्या अर्थाने लोकशिक्षक असतो.प्राचार्य डॉ.पी.जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शिक्षक हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवीत असतो.शिक्षक हा एका विद्यार्थीसाठी सुद्धा तयारी करून जातो. शिक्षकांचे स्थान हे समाजात महत्त्वाचे होते‌.गावाच्या विकासात महत्त्वाचं स्थान असणारा घटक म्हणजे शिक्षक.आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देणारा निस्वार्थी व्यक्ती म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाप्रति भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी  प्रा.राम गोसावी, चेअरमन डॉ.राहुल पाटील प्रा.योगेश कुलकर्णी , प्रा.सुप्रिया नवले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Raigad: The respect for teachers abroad is not seen in our country - Veer Wajekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.