पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 03:14 PM2018-01-20T15:14:31+5:302018-01-20T15:15:03+5:30

रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून  5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला.

Raigad Food and Drug Administration raids in Panvel, ban on smokable tobacco stock from two stables | पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त

पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त

googlenewsNext

पनवेल -  रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून  5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला असून, हे पान स्टॉल पनवेल बस स्टॅण्डच्या जवळच असल्याने या ठिकाणी पुन्हा प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होऊ  नये म्हणुन दोन्ही पान स्टॉल अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार सिल करण्यात आले असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी दिली आहे.
    पनवेल शहरात प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पेण अन्न व औषध प्रशासन कार्यालयास पनवेल शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडु यांच्योकडुन मिळाल्यावरून ठाणो येथील सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब समुद्रे, रमाकांत कुलकर्णी व राम भरकड यांनी केली आहे. रायगड जिल्हय़ात छुप्या पध्दतीने प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होत असलेल्या ठिकाणी रायगड अन्न व औषध प्रशासनाने स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या मदतीने छापे व जप्तीची कारवाई करीत आहे.
    गुटखा, पान मसाला, चघळण्याचा तंबाखू यांच्या रूपात आढळून आलेल्या तंबाखू, सुपारी व त्यात वापरण्यात येणारी अनेक अपमिश्रकांच्या घातक परिणमामुळे अॅक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, मुखाचा कर्करोग, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, जठर, आतडे, व श्वसन या संबंधिचे आजार होत असून गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांचे व्यसन लागत असल्यामुळे खाणा:यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा हिताच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2००6 अंतर्गत कलम 3० (2)(अ) नुसार अन्न सुरक्षा आयुक्तांनी गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट,सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट,सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उप्तादित चघळण्याची तंबाखू,मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यास दि. २० जूलै २०१७  पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.
    रायगड जिल्हय़ात कोठेही छुप्या पध्दतीने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट-सुगंधित सुपारी, उत्पादित चघळण्याचा तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री होत असल्यास  प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 18००222365 अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०2143-252०85 वर संपर्क साधावा,असे आवाहन रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी केले आहे.

Web Title: Raigad Food and Drug Administration raids in Panvel, ban on smokable tobacco stock from two stables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा