सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:05 AM2019-01-23T00:05:51+5:302019-01-23T00:06:01+5:30

‘लायन्स अलिबाग फेस्टिवल-२०१९’चे आयोजन यंदा २४ ते २८ जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आले आहे.

 Program of open-handed manifestations of all-round public representatives | सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम

Next

अलिबाग : ‘लायन्स अलिबाग फेस्टिवल-२०१९’चे आयोजन यंदा २४ ते २८ जानेवारी दरम्यान अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आले आहे. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता फेस्टिवलचे उद्घाटन झाल्यावर लगेच या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या प्रकटमुलाखतींचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष भगवान मालपाणी यांनी दिली आहे.
मुलाखतकार सुधीर गाडगीळ राजकीय पक्षांच्या दिग्गज ज्येष्ठ पक्षप्रतिनिधींची मुलाखत घेणार आहेत. शिवसेना नेते राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, काँग्रेसचे नेते राज्यसभा सदस्य खा. हुसेन दलवाई, शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, भाजपा नेते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आ. मधू चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील तटकरे हे कोकणवासीयांच्या विकासाच्या मुद्द्यावर या प्रकट मुलाखत कार्यक्रमात आपली भूमिका मांडणार असल्याने, या कार्यक्रमाबाबत सर्वपक्षीयांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शुक्रवार, २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘पेट ब्रीड आणि फॅशन शो’ होणार असून, संध्याकाळी ६.३० वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, अलिबागच्या उप नगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक आदी उपस्थित राहणार असल्याचे फेस्टिवल समिती समन्वयक अनिल जाधव यांनी सांगितले.
शनिवार, २६ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता ‘हरित साजश्रृंगार’ या ताज्या भाज्या व फळांपासून दागिने बनविण्याच्या आगळ्या स्पर्धेचे आयोजन के लेआहे. तर संध्याकाळी ७ वाजता ‘लायन रायगड श्री २०१८’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती फेस्टिवल समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली .
>एकपात्री अभिनय स्पर्धा
रविवार, २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वा. एकपात्री अभिनय स्पर्धा, तर ७ वाजता हेअर अ‍ॅण्ड मेकअप शोचे आयोजन करण्यात आले आहे, या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित राहणार असल्याचे फेस्टिवल समितीचे उपाध्यक्ष परेश भाठेजा यांनी सांगितले. समारोप सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता उद्योगमंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. पंडित पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Web Title:  Program of open-handed manifestations of all-round public representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.