संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:03 AM2018-01-06T07:03:37+5:302018-01-06T07:03:53+5:30

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यातील समुद्र उधाण संरक्षक बंधाºयांच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षांत केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटण्याची समस्या आणि खारे पाणी जवळच्या भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक होण्याची समस्या आता अत्यंत उग्र स्वरूप धारण करू लागली आहे.

 The problem of the security bunds continues, the breakthrough in the 10 places of security | संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे

संरक्षक बंधारे फुटीची समस्या कायम, , १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास भगदाडे

Next

- जयंत धुळप
अलिबाग  - अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यातील समुद्र उधाण संरक्षक बंधाºयांच्या डागडुजी आणि दुरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षांत केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र संरक्षक बंधारे उधाणाच्या भरतीने फुटण्याची समस्या आणि खारे पाणी जवळच्या भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी नापीक होण्याची समस्या आता अत्यंत उग्र स्वरूप धारण करू लागली आहे. यामुळे चिंताग्रस्त शेतकºयांमध्ये संतापाच्या लाटांचे उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांत आठव्या वेळेला गुरुवारी रात्री पौष कृ. तृतीयेच्या रात्री सागरी उधाणाच्यावेळी मोठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजूकडील समुद्र संरक्षक बंधाºयास एकूण १० ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारे पाणी या ३०० एकरपेक्षा अधिक भातशेती जमिनीत घुसून सुमारे ५०० शेतकºयांच्या शेतजमिनी खाºया झाल्या आहेत.
शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार संरक्षक बंधाºयास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाºयास दोन ठिकाणी, लेहरीकोठा बंधाºयास आणि भंगारकोठा संरक्षक बंधाºयास प्रत्येकी एक ठिकाणी व अन्य दोन अशा एकूण १० ठिकाणी संरक्षक बंधाºयास मोठी भगदाडे पडली आहेत. सर्वात मोठे भगदाड (खांड) २० फूट लांबीचे आहे. बंधारे फुटून समुद्राचे खारे पाणी गावातील वस्तीपर्यंत पोहचले आहे.

शासकीय अधिकारी फिरकले नाही

1गेल्या तीन महिन्यांपासून संरक्षक बंधारे फुटीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले असताना, या विषयाशी निगडित खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने कोणत्याही स्वरूपाची प्रतिबंधक उपाययोजना वा आपत्ती नियंत्रणात्मक उपाययोजना देखील केलेली नाही. खारभूमी विभागाची कार्यवाही अद्यापही सुस्तावलेल्याच अवस्थेत आहे. यामुळे बाधित व संभाव्य बाधित अशा सर्वच शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
2गुरुवारी संरक्षक बंधारे फुटून शहापूर धेरंड परिसरात समुद्राचे खारे पाणी घुसण्याच्या या घटनेस बारा तास उलटून गेले तरी कोणत्याही शासकीय विभागाचा कोणताही कर्मचारी वा अधिकारी या आपद्ग्रस्त परिसरात फिरकलेला नाही. मोठे शहापूर गावात शेतकºयांनी शुक्रवारी संध्याकाळी बैठकीसाठी गावकी अध्यक्ष अमरनाथ भगत यांना बोलावले असून त्यात पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

उधाणाचे हेच खारे पाणी शेतजमीन ओलांडून पुढे मोठे शहापूर गावातील २५ तर धाकटे शहापूर गावातील १७ घरांच्या पायापर्यंत पोहोचून या सर्व घरांच्या भोवती समुद्रासारखी परिस्थिती तयार होवून धोका निर्माण झाला आहे.
100
वर्षे जुन्या जि.प. शाळा इमारतीला देखील खाºया पाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे समन्वयक तथा शहापूरमधील शेतकरी राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

शेतकºयांचे नुकसान
शहापूर-धेरंड ही गावे जिताडा, कोळंबी आणि खौल या माशांच्या शेती व संवर्धनाकरिता प्रसिध्द आहेत. या मत्स्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्स्य तलाव आहे. गुरु वारी रात्रीच्या या उधाणाचे खारे पाणी धाकटे शहापूर गावातील शेती ओलांडून एकूण २० मत्स्य तलावांत घुसून पुढे वाहात गेल्याने तलावातील तयार विक्री योग्य मासे वाहून गेल्याने, मस्यतळी शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मत्स्य शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शहापूर-धेरंड ही गावे
संरक्षक बंधारे फु टून वारंवार शेतकºयांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शासकीय यंत्रणा याकडे लक्ष देत नसल्याने काय करावे अशा प्रश्न येथील शेतकºयांना पडला आहे. भात हे येथील मुख्य पीक असून याच पिकाचे नुकसान झाल्याने मोठा फटकाशेतकºयांना बसला आहे. नैसर्गिक संकटाबरोबरच येणाºया या कृ त्रिम संकटाने शेतकरी हतबल झाला आहे. तेव्हा या बंधाºयाच्या दुरु स्तीसाठी मदत करावी, अशी मागणी वारंवार हे शेतकरी शासनाकडे करीत आहेत. 

Web Title:  The problem of the security bunds continues, the breakthrough in the 10 places of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड