एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा कर्जतमध्ये हस्तगत; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:13 PM2020-02-26T23:13:28+5:302020-02-26T23:13:31+5:30

आरोपींना २९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

One lakh 3 thousand rupees Ganja captured in Karjat | एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा कर्जतमध्ये हस्तगत; दोघांना अटक

एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा कर्जतमध्ये हस्तगत; दोघांना अटक

Next

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत साडेपंधरा किलो गांजा व वाहतूक करणारी गाडी, असा नऊ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, २९ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कर्जत शहरातून नशाकारक अमली पदार्थांची वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी, पोलीस हवालदार स्वप्निल येरुणकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत देशमुख यांनी कर्जत-पळसदरी रस्त्यावरील हॉटेल कर्जत किंग रेस्टॉरंट समोरील रोडवर सापळा लावला होता, त्या वेळी या रस्त्यावरून संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी नंबर एम-एच-४६ बी के १५१९ ही गाडी जात असताना पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली. गाडीमध्ये एक काळ्या रंगाचे पोते आढळून आले, त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीतील अवदेश चंद्रशेखर वर्मा (३१, रा. कर्जत महावीर पेठ), मुन्नीलाल ललकारी राजभर (२५, सध्या रा. मुद्रे-कर्जत, मूळचा रा. बेहरी, उत्तर प्रदेश) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास स्था. गु. अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पोमण हे करीत आहेत.

मंगळवारी रात्री केली कारवाई
पोलिसांनी एक लाख ८६ हजार रुपयांचा गांजा व वाहतूक करणारी गाडी किंमत आठ लाख रुपये असा एकूण नऊ लाख ८६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास केली.

Web Title: One lakh 3 thousand rupees Ganja captured in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.