म्हसळा बायपास ठरतोय जीवघेणा, चिखल, खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:16 AM2018-08-17T02:16:14+5:302018-08-17T02:16:27+5:30

म्हसळा तालुक्यातील म्हसळा बायपाससहित, म्हसळा माणगाव, दिघी, तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे.

number of accidents increased due to fatal, mud and potholes | म्हसळा बायपास ठरतोय जीवघेणा, चिखल, खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली

म्हसळा बायपास ठरतोय जीवघेणा, चिखल, खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली

googlenewsNext

- अरुण जंगम
म्हसळा  - म्हसळा तालुक्यातील म्हसळा बायपाससहित, म्हसळा माणगाव, दिघी, तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांना रोजच कष्टमय प्रवास करावा लागतो. याबाबत बांधकाम विभाग व ठेकेदार यांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे माजी सभापती महादेव पाटील यांनी सांगितले.
म्हसळा तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असणाºया श्रीवर्धन तालुक्याचे प्रवेशद्वार आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटक पुरते हैराण झाले आहेत. श्रीवर्धन तालुक्यात दरवीकेंडला मुंबई व पुण्याकडून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र, रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे पर्यटकांची संख्या रोडावत चालली आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रवास करणाºयांना पाठदुखी, कंबरदुखी सारख्या समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, संबंधित अधिकारी फक्त आश्वासनांवर बोळवण करीत आहेत. या सर्व प्रकारात प्रवासी मात्र खड्डेमय प्रवास कधी संपणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हसळ्यातील काही रस्त्यांना डांबरीकरणाची गरज आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम खाते कोणत्याही उपाययोजना करण्यास तयार नाही. कोणताही राजकीय नेता या रस्त्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाºयांनी देखील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने, परिसरातील नागरिक, चालक पुरते हैराण झाले आहेत.
म्हसळा ते दिघी रस्त्याची डागडुजी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात आली होती. हे अंतर ३२ किलोमीटर एवढे आहे, तर मणगाव-म्हसळा २८ कि.मी. असून, केवळ दिघी पोर्टच्या अवजड वाहनांमुळे हे रस्ते खराब झाले आहेत.
म्हसळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळेही रस्ते खराब झाले आहेत. परिणामी, सामान्य नागरिक, पादचारी, शालेय विद्यार्थी, वाहनचालक आदीना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत असून पर्यटकांसहित स्थानिकही त्रस्त आहेत.
तालुका परिसरातील आणि लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांत रस्ता शोधत मार्गक्र मण करावे लागत आहे. खड्डे चुकवत वाहन चालवताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
तालुक्यातील अनेक रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, ते डांबरीकरणाचे काम निकृष्ट असल्याने पहिल्याच पावसात दैना झाली. याशिवाय खासगी नळजोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा कोणतेही शुल्क न भरता रस्ते खोदून नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. नळजोडणीसाठी रस्ता खोदल्यानंतर परत त्या रस्त्याची दुरु स्ती न करता तात्पुरत्या स्वरूपात रेती, सिमेंट टाकण्यात येते. मात्र, हे सिमेंट, रेती टिकत नसल्याने खड्डे जैसे थे आहेत. बांधकाम विभागाचे अधिकाºयांकडून खासगी नळजोडणी घेणाºयांवर कडक कारवाई न करता केवळ नोटीस पाठवली जाते. त्यांनी केवळ नोटीस न बजावता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
तालुक्यात काही खासगी कंपनीची केबल टाकण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले होते. काम करण्यासाठी रस्त्याची साइडपट्टी पूर्णपणे खोदण्यात आली होती. मात्र, यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरदहस्त असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
म्हसळा शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनत आहे. दिघी पोर्टच्या वाहनांची बायपासवर दुतर्फा पार्किंग केल्याने वाहनचालकांना अरुं द मार्गावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. म्हसळा शहरातील वाहतूककोंडीला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी म्हसळा बायपास तयार करण्यात आला आहे. सदर बायपास तयार केल्यानंतर काही वर्षांतच दिघी पोर्टची अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू झाली. सुरु वातीला ही अवजड वाहतूक कमी प्रमाणात होत होती. आज २५ ते २७ टन वजनाच्या पोलादी कॉइल, कोळसा, यांची वाहतूक करणारे ट्रेलर, मोठे डम्पर या मार्गावरून वाहतूक करू लागले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर या अवजड वाहनांचा व्याप वाढल्याने दिघी पोर्ट जवळ ही वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडते. त्यामुळे अवजड वाहतूक करणारे ट्रेलर, डम्पर म्हसळा बायपास जेथून सुरू होतो त्या एच.पी. पेट्रोलपंपापासून जवळ जवळ ५०० मीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दिवस-रात्र उभे असतात. त्यामुळे बायपासचा वापर करणाºया श्रीवर्धन, बोर्ली, बागमांडला, दिघीकडील प्रवासी वाहनांसहित दिवेआगर, हरिहरेश्वर येथे जाणाºया पर्यटकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

चिखलमय रस्त्यामुळे
वाहने घसरल्याने अपघात
दिघी ते माणगाव मार्गाच्या रु ंदीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये म्हसळा बायपासचा देखील समावेश आहे. पावसामुळे बायपास चिखलमय झाला असून, गेल्या दोन दिवसांत आठ ते दहा पर्यटकांच्या दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाले आहेत. कित्येक चारचाकी वाहनांवरील वाहकाचा ताबा सुटल्याने अपघात होता होता वाचले आहेत. त्यातच दुतर्फा लागलेली दिघी पोर्टची अवजड वाहने उभी असल्यामुळे या किरकोळ घटनांचे अनेक मोठ्या अपघातांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्वरित ही दिघी पोर्टची अवजड वाहने म्हसळा बायपासवरून हटवावी, अशी मागणी म्हसळा शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

म्हसळा तालुक्यातील रस्त्यावरून प्रवास करताना पावसामुळे झालेल्या या रस्त्यावरील चिखलाने अनेक दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होता होता बचावले आहेत, त्यातच या दिघी पोर्टच्या दुतर्फा लागलेल्या ट्रेलरमुळे या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. या दिघी पोर्टच्या वाहनांना या बायपासवरून त्वरित हटवावे.
- सचिन करडे, अध्यक्ष, गरजा महाराष्ट्र प्रतिष्ठान, म्हसळा
सदर रस्त्यांचे काम करताना ठेकेदार थातुरमातुर पद्धतीने खड्डे भरीत आहेत, त्यांनी तसे न करता योग्य रीतीने भरावेत.
- महादेव पाटील, माजी सभापती, म्हसळा
म्हसळा तालुक्यातील सर्वच अंतर्गत रस्ते अतिशय खराब झाले आहेत, त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यांची वेळीच डागडुजी न केल्यास सर्व वाहतूक ठप्प होईल.
- अभय कळमकर, विक्र म चालक
 

Web Title: number of accidents increased due to fatal, mud and potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.