महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:18 AM2018-12-29T03:18:11+5:302018-12-29T03:18:48+5:30

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे.

 The need for setting up a garbage disposal center at the threshold of district evil due to the massive dump | महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

googlenewsNext

- आविष्कार देसाई

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नसल्याचे वास्तव असल्याने जिल्हा फार मोठ्या आपत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणाच नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. मध्यंतरी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विविध नगर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कचºयाच्या प्रश्नी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून डम्पिंग ग्राउंडच्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत फक्त सातच प्रस्ताव आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यात राबवून सरकारी कार्यालये, विविध आस्थापने चकाचक करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वेळोवेळी जिल्हाभर स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात येतो. या सर्व अभियानातून मोठ्या संख्येने कचरा गोळा केला जातो. मात्र, त्यात्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे कचरा टाकायचा कोठे आणि त्याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न पडतो.

जिल्ह्यामध्ये दररोज सुमारे १५० टन कचरा निर्माण होतो. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नाही. नगर पालिका डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी करतात. मात्र, लगतच्या ग्रामपंचायती त्यांच्या प्रस्तावाला विरोध करतात, असे भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले. धारप यांनी तीन वर्षांपूर्वी कचºयाच्या गंभीर समस्येबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

डम्पिंग ग्राउंडसाठी जमीन मागण्यापेक्षा जिल्हा परिषदेसाठी एक कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची खरी गरज आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये ९ जिल्हा परिषद गटासाठी एक याप्रमाणे पाच कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याकडेही धारप यांनी लक्ष वेधले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या कचरा विल्हेवाट केंद्रासाठी निधी प्राप्त होण्यात कोणतीच अडचण राहणार नाही आणि असे झाले तर वैयक्तिक डम्पिंग ग्राउंडच्या मागणीचा प्रश्नच राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डम्पिंग ग्राउंडच्या जागेच्या मागणीसाठी आलेले प्रस्ताव

अलिबाग तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतीने ताडवागळे येथे ६८ गुंठे जागेची मागणी केली आहे. माणगाव तालुक्यातील माणगाव नगर पंचायतीने उतेखोर येथे एक हेक्टर तीन गुंठे जागा मिळावी असा प्रस्ताव दिलेला आहे. तळा तालुक्यातील अंबोली येथील एक हेक्टर चार गुंठे, माथेरान नगर परिषदेने ५९ गुंठे, खालापूर तालुक्यात महड येथील सहा हेक्टर ९५ गुंठे, खालापूर तालुक्यातीलच तुपेगाव ग्रामपंचायतीने १० गुंठे आणि नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ येथे एक हेक्टर ९० गुंठे जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी समिती जागा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. ते प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Web Title:  The need for setting up a garbage disposal center at the threshold of district evil due to the massive dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड