मिनीट्रेनची शटल सेवा आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:43 AM2017-10-30T00:43:28+5:302017-10-30T00:43:28+5:30

मिनीट्रेन १ मे व ८ मे २०१६ रोजी किरकोळ अपघात होऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ बंद के ली होती. यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

Minutrain shuttle service starts from today | मिनीट्रेनची शटल सेवा आजपासून सुरू

मिनीट्रेनची शटल सेवा आजपासून सुरू

Next

माथेरान : येथील मिनीट्रेन १ मे व ८ मे २०१६ रोजी किरकोळ अपघात होऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ बंद के ली होती. यामुळे येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. मात्र नेरळ-माथेरान ही महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज मिनीट्रेन ३० आॅक्टोबरपासून स्थानिकांसह पर्यटकांच्या दिमतीला धावणार आहे. त्यामुळे माथेरानकरांचे रेल रोको आंदोलन तूर्तास स्थगित केले असून, माथेरानकरांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
माथेरानची जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ-माथेरान मिनीट्रेन सुरक्षेचे कारण देत रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी बंद केली. ही मिनीट्रेन सुरू व्हावी यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत याबाबत निवेदन दिले होते. आमदार सुरेश लाड यांनी शरद पवारांच्या सहकार्याने तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना विनंती केल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी सात कोटी रु पये मंजूर करून कामाला सुरु वात झाली. रेल्वे सुरू होणार याबाबत रेल्वेकडून तारखांवर तारखा मिळत होत्या त्यामुळे हतबल झालेल्या माथेरानकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांनी माथेरानकरांच्या वतीने आंदोलन करण्याचे जाहीर केले. १ नोव्हेंबर रोजी नेरळ येथे रेल रोको होणार होता. त्या आंदोलनाच्या भीतीपोटी रेल्वे प्रशासनाने ३० आॅक्टोबर रोजी ही मिनीट्रेन सुरू केली.
२९ आॅक्टोबरला या मिनीट्रेनची अंतिम चाचणी घेण्यात आली. ही मिनीट्रेन अधिकाºयांना घेऊन सकाळी ९.४५ ला नेरळहून सुटली. ती सर्व पाहणी करत जुमापट्टी,वॉटरपाइप व अमन लॉज ही स्टेशन घेत दुपारी १.१५ वाजता माथेरानमध्ये पोहोचली. नंतर माथेरान ते अमनलॉज स्टेशनपर्यंत शटलची चाचणी घेण्यात आली. यामध्ये रेल्वे प्रशासनाचे सी.डी. ओम जनरल आर. के.मोदी, डी. ओम. कोचिंगचे एम.के.गोयल, सिनियर डी.सी.एम. आदी अधिकाºयांनी पाहणी करून अंतिम अहवाल तयार करून माथेरान-अमन लॉज शटल सेवा ३० आॅक्टोबरला सुरू होईल, तसेच नेरळ-माथेरान मिनीट्रेन ही एप्रिल महिन्यात सुरू होईल, असे सांगितले. याप्रसंगी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजय सावंत,राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर,स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सागर पाटील सह नागरिक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Minutrain shuttle service starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.