माणगाव, तळामधील समस्यांचा वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:08 PM2019-06-07T23:08:46+5:302019-06-07T23:09:02+5:30

आढावा बैठकीत नागरिकांची तक्रार : अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या आमदारांच्या सूचना

Mangaon and the problems in the bottom will be read | माणगाव, तळामधील समस्यांचा वाचला पाढा

माणगाव, तळामधील समस्यांचा वाचला पाढा

Next

माणगाव : माणगाव, तळा तालुक्यातील आढावा बैठकीत पाणीटंचाईमुळे होणारे हाल, आरोग्य, शैक्षणिक अशा विविध समस्यांचा पाढा नागरिकांनी वाचला. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सहकार्य करण्याच्या सूचना आ. अनिके त तटकरे यांनी केल्या. तर माणगाव शहरात वाहतूककोंडी प्रश्न मोठा आहे, यावर पोलीस यंत्रणेने मार्ग काढावा, असे सांगितले.

पाणीपुरवठा, शिक्षण, महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ, उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृ षी विभाग, वनखाते अशा अनेक सरकारी विभागातील अधिकाºयांची झडती घेण्यात आली. या बैठकीत निजामपूर विभागात पाणीटंचाईचा प्रश्न राजाभाऊ रणपिसे यांनी उपस्थित केला. या वेळी टँकरने पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन मिळाले. तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकार व निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. शिक्षण विभागात होणाºया बदल्या संगनमताने होतात. ताम्हणी शाळा का बंद करण्यात आली, असे आरोप या बैठकीत करण्यात आले. तसेच १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याने विविध दाखल्याकरिता विशेष कॅम्प लावण्याची सूचना आ. अनिकेत तटकरे यांनी केली.

महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने, आदिवासी योजना, अंतर्गत नवीन लाइन टाकणे, एलटी व एसटी पोल बदलणे याबाबत माहिती घेतली असता या माणगाव विभागात १० टक्के ही काम न झाल्याचे दिसले. तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे डॉक्टर कमी असून, नर्सही कमी आहेत. तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रेही आहेत. १२ पैकी सहा जागा रिक्त आहेत. लोणेरे उपकेंद्र जागेअभावी बंद असून नवीन प्रस्तावित जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठमध्ये करण्याचा प्रस्ताव केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परदेशी यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागास पावसाळ्याच्या अगोदर सर्व रस्त्यांचे खड्डे भरण्यास आमदार अनिकेत तटकरे यांनी सूचना दिल्या, तसेच पावसाळ्यात कोणतीही स्कूलबस बंद होऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घ्यावयास सांगितले. यावेळी तहसीलदार प्रियंका अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना माहिती द्या
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी उन्नत शेती अंतर्गत शेती शाळा घ्यावी तसेच फलोत्पादन व भाजीपाला अंतर्गत शेतकºयांना माहिती मिळावी, जेणेकरून तरुण मंडळी शेती चांगल्या पद्धतीने करतील, अशा सूचना आमदार अनिकेत तटकरे यांनी केल्या.

Web Title: Mangaon and the problems in the bottom will be read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.