खरे असते ते लपत नाही, कधी तरी बाहेर येते - पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:04 AM2019-04-14T01:04:34+5:302019-04-14T01:06:03+5:30

सत्तेवर आल्यापासून या सरकारने आघाडी सरकारातील अनेकांवर आरोप केले आहेत.

 It does not hide what is true, sometimes it comes out - Pawar | खरे असते ते लपत नाही, कधी तरी बाहेर येते - पवार

खरे असते ते लपत नाही, कधी तरी बाहेर येते - पवार

कर्जत : सत्तेवर आल्यापासून या सरकारने आघाडी सरकारातील अनेकांवर आरोप केले आहेत. माझे वडील अजित पवारांवरही आरोप केले; परंतु ते यांना सिद्ध करता आले नाहीत. खरे असते ते लपत नाही, कधी ना कधी ते बाहेर येतेच, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, असे बोलणाऱ्यांनी आता ‘खरेच’ कुठे नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र हे बघण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या साडेचार वर्षांत राज्यावर दुप्पट कर्ज झाले आहे. गेली पाच वर्षे या सरकारने सर्वांना त्रासच दिला आहे. सारे जण वैतागले आहेत. या भागातील अनेक प्रश्न आहेत. रेल्वेचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी येथे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष आणि मित्रपक्ष आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ मार्केवाडी येथील मयूरेश मंगल कार्यालयात संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार सुरेश लाड, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, समाज कल्याण सभापती नारायण डामसे आदी उपस्थित होते.

Web Title:  It does not hide what is true, sometimes it comes out - Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.