जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता व मॉनिटरिंग स्टेशन केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 07:28 PM2022-11-22T19:28:34+5:302022-11-22T19:29:40+5:30

बंदर क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्तेचे नियमन करण्यात होणार मोलाची मदत

Inauguration of JNPA's Sea Water Quality and Monitoring Station Centre | जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता व मॉनिटरिंग स्टेशन केंद्राचे उद्घाटन

जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता व मॉनिटरिंग स्टेशन केंद्राचे उद्घाटन

Next

मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीएच्या सागरी जल गुणवत्ता केंद्र,  मॉनिटरिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिक पर्यावरण निरीक्षण वाहनाचे उद्घाटन अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी ( २१) करण्यात आले. सागरी जल गुणवत्ता केंद्र,मॉनिटरिंग स्टेशन प्रणालीमुळे जेएनपीए बंदर परिसरातील पाण्याची गुणवत्ता, इलेक्ट्रिक मॉनिटरिंग वाहन बंदर क्षेत्रातील सागरी पाणी आणि हवेच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी बंदर क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्तेचे नियमन करण्यात मोलाची मदत होणार आहे. तापमान, पीएच, विरघळलेला ऑक्सिजन, अमोनिया, चालकता, नायट्रेट, क्षारता यासारख्या पाण्याच्या गुणवत्तेच्या स्टेशनच्या डेटाद्वारे बंदर इस्टेटच्या आसपासच्या पर्यावरणीय गुणवत्तेचे पालन तपासण्या व्यतिरिक्त जेएनपीए वाहनांच्या ग्रीनहाऊस गॅस फूटप्रिंट कमी करण्यास सक्षम ठरणार आहे. तसेच गढूळपणा आणि सागरी पाण्याची टीडीएस, गुणवत्तेचा डेटाबेस, सागरी वातावरणातील स्वच्छता आदी मानके राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

ई-वाहन येथे सुरू असलेल्या सभोवतालची हवा आणि ध्वनी निरीक्षणासाठी मदतगार साबित होणार आहे.तसेच मरीन वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन आणि ई-वाहनांचे लाँचिंग हे शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष संजय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे. या आयोजित उद्घाटन प्रसंगी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, जेएनपीएचे सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जेएनपीएने आयआयटी  मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या सहकार्याने सागरी जल गुणवत्ता देखरेख केंद्र, इलेक्ट्रिक पर्यावरण निरीक्षण केंद्र विकसित केले आहे. त्याशिवाय विविध पर्यावरणीय सुधारणा आणि ग्रीन पोर्ट उपक्रमही सुरू केले आहेत. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, व्यापक घनकचरा व्यवस्थापन सुविधा, बंदर परिसरात आणि टाउनशिपमध्ये बदललेले एलईडी दिवे,ई आरटीजीसीएस, किनाऱ्यावरील वीज पुरवठा, पुनरुत्थान  शेवा मंदिर आणि शेवा पायथ्याजवळील जलकुंभ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे वाहतूक सुलभतेसाठी पुढाकार, खारफुटीचे व्यवस्थापन, तेल गळती प्रतिसाद इत्यादीसह पोर्ट ग्रीन कव्हर आदी बाबीं बरोबरच ४.१० एमडब्लूपी क्षमतेचे सौर पॅनेलही  स्थापित केले आहेत.यामुळे सरासरी ३८ %  उर्जेची आवश्यकता अक्षय ऊर्जेसाठी होते आहे. उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी बंदर परिसरात एलईडी दिवेही देखील स्विच करण्यात आले आहेत.

Web Title: Inauguration of JNPA's Sea Water Quality and Monitoring Station Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.