खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:37 AM2018-09-01T04:37:29+5:302018-09-01T04:37:59+5:30

सिडको उभारणार प्रकल्प : दोनशे कोटींचा खर्च अपेक्षित

 The green lantern of the center from Kharghar to CBD Coastal Road | खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील

खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील

Next

पनवेल : खारघर ते सीबीडीदरम्यान खाडीकिनारी सुमारे दोनशे कोटी रु पये खर्च करून सिडकोकडून कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. नुकतीच केंद्रीय पर्यावरण विभागाने या रस्त्याला मंजुरी दिली आहे. लवकरच सिडको याकरिता निविदा मागविणार आहे.

खारघर शहर निर्माण करताना सिडकोने खारघर, तळोजा वसाहतीमधील नागरिकांना मुंबई परिसरात विनाअडथळा जाता यावे, यासाठी खारघर सेक्टर ४३ ते स्पॅगेटी वसाहतीपर्यंत चार पदरी रस्ता उभारला आहे. सिडकोने स्पॅगेटी वसाहत, सेक्टर १0, खारघर स्थानक आणि सेक्टर ११ खाडीकिनाऱ्यावरून नवी मुंबईत पामबीच जाता यावे, यासाठी सिडकोने कोस्टल रोडचे नियोजन केले होते. मात्र, खाडीलगत असलेल्या कांदळवनांची कत्तल करावी लागत असल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने यावर बंदी घातली होती. आता पन्नास मीटरपर्यंत कामे करता येणार असल्याची परवानगी दिल्यामुळे सिडकोने कोस्टल रोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. स्पॅगेटी ते खारघर स्थानकापर्यंत रस्ते उभारणीला पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. तसेच खारघर ते सीबीडी खाडीकिनारा दरम्यानच्या रस्त्याला लवकरच परवानगी मिळणार असल्यामुळे सिडकोकडून रस्त्यासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च करण्याचे नियोजन आहे.
पुढील वर्षी मार्चअखेरीस रस्त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत

सायन-पनवेल महामार्गावरील स्पॅगेटी आणि खारघर टोल नाका दरम्यान पूल उभारताना कोस्टल मार्गे सीबीडीवरून पनवेलच्या दिशेने जाता यावे यासाठीही रस्ता केला जाणार आहे.

खारघर ते सीबीडी दरम्यान कोस्टल रोड झाल्यास सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका ते सीबीडी, नेरु ळ, सानपाडा दरम्यान होणारी वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तळोजा-खारघरमधील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी रस्त्याचा उपयोग होणार आहे.

खारघर-सीबीडी दरम्यान उभारल्या जाणाºया कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.
हा प्रकल्प सिडकोकडून उभारला जाणार असून, पुढील वर्षी या रस्त्याच्या उभारणीसाठी निविदा काढण्याचा सिडकोचा विचार आहे.
- सीताराम रोकडे, प्रशासक, खारघर सिडको

 

Web Title:  The green lantern of the center from Kharghar to CBD Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.