म्हसळा तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न अखेर निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:18 PM2018-12-29T23:18:06+5:302018-12-29T23:18:14+5:30

ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी सहा कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.

 Finally, water dispute of villages in Mhasla taluka is taken out | म्हसळा तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न अखेर निकाली

म्हसळा तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न अखेर निकाली

Next

- अरुण जंगम

म्हसळा : ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी सहा कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्ह आहेत.
म्हसळा तालुक्याची लोकसंख्या ५० हजार आहे. तालुक्यात एकूण ८४ गावे वसलेली आहेत. तुरुंबाडा, काळसुरी, गोंडघर मोहल्ला, सुरई मोहल्ला, खारगांव (बुद्रुक), मांदाटणे, केल्टेबाउलकोंड, सोनघर, रेवली, वाडांबा, कोंझरी, ठाकरोली, पानवे, वावे गावांना ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा होणार आहे.
म्हसळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी कायमस्वरूपीच्या जलसाठ्यांचा अभाव आहे. तलाव, बंधारे यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनात्मकदृष्ट्या नगण्य आहे. काही ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचा फटका तालुक्यातील सर्व जनतेस बसत आहे. शेतीस पूरक वातावरण आहे; परंतु कायमस्वरूपीच्या जलस्रोतांची कमतरता आहे.
म्हसळा हे दक्षिण काशी व त्याचप्रमाणे सुवर्ण गणेश दिवेआगर यांचे मध्यवर्ती स्थान असल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरला वर्षभर संपूर्ण भारतातून भाविक येत असतात. दिवेआगार हे सुवर्ण गणेशाची भूमी आहे व दिघी बंदर अनेकांच्या कुतूहलाचे ठिकाण आहे, त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा तालुक्यात वावर असतो; परंतु आज ही म्हसळा तालुका मूलभूत गरजांच्या प्रतीक्षेत आहे. या सर्व बाबींकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

उन्हाळ्यात जनतेची
पाण्यासाठी वणवण
म्हसळा तालुक्यात या वर्षी उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी वणवण सर्वत्र निदर्शनास आली. तुरुंबाडी, काळसुरी, ठाकरोली, पानवे वावे, सुरई मोहल्ला त्याचप्रमाणे गोंडघर मोहल्ला या गावांतील लोकांना पाण्यासाठी गावापासून दोन दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी जावे लागत होते, तरीसुद्धा पाणी उपलब्ध होण्याची शाश्वती नव्हती.
‘लोकमत’ने ‘तालुक्यातील गावे पाण्च्याच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली जनतेच्या व्यथा मांडल्या होत्या, त्या नंतर दोन दिवसांत संबंधित गावांमध्ये बोअरवेल खोदण्यात आल्या.

Web Title:  Finally, water dispute of villages in Mhasla taluka is taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी