ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:39 AM2024-04-15T09:39:45+5:302024-04-15T09:42:44+5:30

अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली.

E-rickshaws came, but the tourists were punished with a pipe | ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

मुकुंद रांजाणे, लोकमत न्यूज नेटवर्क 
माथेरान
: अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली. परंतु, काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली आहे. शहरात सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात चार ते पाच रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. माथेरानमध्ये अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात सात रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू केला.  पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा बंद अवस्थेतच पडून होत्या. त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते.

...म्हणून हातरिक्षाचालक संतापले
माथेरानमधील हातरिक्षाचालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या हातरिक्षाचालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे, असा आरोप आहे.

वाहने नादुरुस्त का झाली?
- हा प्रकल्प पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा ठेकेदारास चालवण्याकरिता देण्यात आल्या. 
- परंतु, योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत; पण त्यासुद्धा सातत्याने बंद पडत असतात.
- तर, चार ते पाच रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. रिक्षाचालक योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: E-rickshaws came, but the tourists were punished with a pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.