मागणीनुसार पार्थ यांना उमेदवारी दिल्याने जबाबदारी वाढली-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:06 AM2019-03-22T04:06:49+5:302019-03-22T04:07:11+5:30

शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे.

On the demand of Parth, the responsibility was increased- Patil | मागणीनुसार पार्थ यांना उमेदवारी दिल्याने जबाबदारी वाढली-पाटील

मागणीनुसार पार्थ यांना उमेदवारी दिल्याने जबाबदारी वाढली-पाटील

googlenewsNext

नेरळ - शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे. मात्र आपले मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाची कर्जत आणि खालापूर तालुक्यात ताकद वाढली आहे हे मानायला तयार नाही असे प्रतिपादन शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी के ले.
कर्जत येथील शेळके मंगल कार्यालयात शेतकरी कामगार पक्षाचे वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी संवाद सभा आयोजित केली होती, या वेळी पाटील बोलत होते. आम्हाला शिवसेनेला येथे वाढवायचे नसल्याने आम्ही मावळ आणि रायगड दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी शिवसेनेला जवळ घेऊन निवडणूक लढतात म्हणून आज ही संवाद सभा घेण्याची वेळ आली. आमच्या कर्जत तालुक्यातील कार्यकत्यांना आम्ही आदिवासी म्हणून बोलतो, कारण ते गरीब आहेत; पण त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली आहे हे सतत मान्य करतो. मात्र, आपण आमच्या सोबत पिढ्यान्निपढ्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सेनेला मदत करण्याचे धोरण राबविता हे चूक आहे असे सांगून, जयंत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या सरकारने देशावर ८२ लाख कोटीचे तर राज्य सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. तरीदेखील दुष्काळ असताना मदत होत नाही. त्यामुळे असले गरीबांना आणखी गरीब करणारे आणि हे सरकार पुन्हा नको म्हणून आमच्या आणि पाटील यांच्या स्नेहामुळे पाटील कुटुंबाच्या आग्रहामुळे पार्थ यांना उमेदवारी दिली आहे.
या वेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: On the demand of Parth, the responsibility was increased- Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.