पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:38 PM2019-05-27T23:38:35+5:302019-05-27T23:38:48+5:30

पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Demand for action against the journalist | पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

पत्रकाराला मारहाणप्रकरणी कारवाईची मागणी

Next

अलिबाग : येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
सोमवारी सकाळी पत्रकार भवन येथून हा मोर्चा निघाला. शिस्तबद्धपणे हा मोर्चा पोस्ट आॅफिस - काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा - न्यायालय - पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला. हिराकोट तलाव येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवडणूक आयोगाची परवानगी नसताना मतमोजणी केंद्रात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गुन्हा दाखल करावा. मतमोजणी प्रक्रि या पूर्ण झालेली नसताना मतमोजणी केंद्रात घुसून या प्रक्रि येत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने करावी. आरोपपत्र तयार करून लवकरात लवकर न्यायालयात खटला दाखल करावा. पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवावा. सीसीटीव्ही कव्हरेज फूटेज मिळावेत या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Demand for action against the journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.