'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:05 AM2018-12-13T00:05:26+5:302018-12-13T00:06:05+5:30

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला.

Congress will fight independently in Raigad | 'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

Next

म्हसळा : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. म्हसळा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाईवाटप करून आनंद व्यक्त केला. जसजसा निकाल जाहीर होत होता, तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढताना दिसत होता.

म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मुईज शेख आणि कार्यकर्ते यांनी शहरात फटाके फोडून, पेढे वाटून सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा जयघोष केला. या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष महादेव पाटील, शहराध्यक्ष रफिक घरटकर, उपशहरप्रमुख अजित कळस,अकमल कादिरी, इब्राहिम कासार, मुजीब सुभेदार, नजिर साने, अस्लम चिलमाई, घरटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षकार्यालयासमोर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष डॉ. मुईज शेख यांनी सांगितले, भाजपाला जनतेनेच धडा शिकवला असून त्यांची जागा त्यांना वेळीच दाखवली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा भाजपाला विसर पडल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचे डॉ. शेख यांनी आवर्जून सांगितले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत रायगड लोकसभा व विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.

Web Title: Congress will fight independently in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.