मुरुड शहरातील सीसीटीव्ही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:13 AM2017-10-06T02:13:24+5:302017-10-06T02:13:42+5:30

मुरुड शहरातील बाजारपेठेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग धास्तावला आहे.

Closed CCTV in Murud city | मुरुड शहरातील सीसीटीव्ही बंद

मुरुड शहरातील सीसीटीव्ही बंद

Next

मुरुड जंजिरा : मुरुड शहरातील बाजारपेठेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने शहरातील व्यापारी वर्ग धास्तावला आहे. बाजारपेठेत चार रस्ते एकमेकांना मिळतात. त्याठिकाणी चार कॅमेरे लावण्यात आलेले आहेत; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे चारही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे चोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुरु ड शहरात प्रवेश करताना शहरातील जकात नाका, दस्तुरी नाका, एकदरा पूल या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहेत. जर कोणीही चोरटा शहरातून चोरी करून पळून जात असला तर हे मुख्य मार्ग असून, यामध्ये तो कैद होऊ शकतो, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याठिकाणी पर्यटकांच्या चीजवस्तूही चोरीला जाण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्याकडे विचारणा केली असता, बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे लोकांच्या सहकार्यातून बसवण्यात आलेले आहेत. येथील चारही कॅमेºयांची रॅम गेल्याने ते नादुरु स्त झाले आहेत. लवकरच ते दुरु स्त करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे साळे यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातून मुरुड शहरातील व्यापारी वर्गाची एक सभा सुद्धा आयोजित करण्यात आली होती; परंतु व्यापारी आलेच नसल्याचे यावेळी साळे यांनी सांगितले.

Web Title: Closed CCTV in Murud city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड