कार्लेखिंडीत पनवेल-अलिबाग बस कलंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:19 AM2018-06-18T06:19:24+5:302018-06-18T06:19:24+5:30

अलिबाग येथील कार्लेखिंडीतील उतारावर पनवेल-अलिबाग एसटीचालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या साइडपट्टीवरून कलंडली.

The carnally-laden Panvel-Alibag bus Kalindali | कार्लेखिंडीत पनवेल-अलिबाग बस कलंडली

कार्लेखिंडीत पनवेल-अलिबाग बस कलंडली

Next

अलिबाग : अलिबाग येथील कार्लेखिंडीतील उतारावर पनवेल-अलिबाग एसटीचालकाचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या साइडपट्टीवरून कलंडली. या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, एसटीचे मोठे नुकसान झाले. अपघाताप्रसंगी बसमध्ये २२ प्रवासी होते. बस कलंडल्यामुळे ते भयभीत झाले होते.
पनवेल स्थानकातून चालक एस.व्ही. जाधव हे विना थांबा बस घेऊन (एमएच १४ बीटी २२०७) सकाळी आठच्या सुमारास अलिबागकडे निघाले होते. अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड येथे उतरणीवर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ती रस्त्यालगतच्या साइडपट्टीवरून कलंडली. रस्त्याच्या बाजूला दोन ते तीन फूट खोल असलेल्या खड्ड्यात एसटी अडकल्याने मोठी दुर्दैवी घटना टळली. जीवितहानी झाली नसली तरी एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: The carnally-laden Panvel-Alibag bus Kalindali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात