प्रियकरासाठी आईनेच संपवले दोन्ही लेकरांना; पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:01 AM2024-04-10T09:01:43+5:302024-04-10T09:02:04+5:30

गुन्हे अन्वेषण विभागाने लावला छडा

Both the children were killed by the mother for her lover; The police laid a cane | प्रियकरासाठी आईनेच संपवले दोन्ही लेकरांना; पोलिसांनी लावला छडा

प्रियकरासाठी आईनेच संपवले दोन्ही लेकरांना; पोलिसांनी लावला छडा

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : अलिबाग तालुक्यातील किहीम गावात दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.  विवाहबाह्य संबंधात मुलांचा अडसर होत असल्याने महिलेने पाेटच्या दाेन्ही मुलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.  याप्रकरणी शीतल पोले हिला अटक करण्यात आली आहे.  

मूळचे यवतमाळ (गाव बेलोरे, ता. पुसद) असलेले सदानंद पोले आणि शीतल पोले हे दाम्पत्य आरध्या पोळे (वय ६), सार्थक पोळे (वय ३) यांच्यासोबत किहीम गावात राहत होते. ३१ मार्च रोजी त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी मांडवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या मुलांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासादरम्यान, पोलिसांनी मुलांचे आई-वडील आणि प्रियकराला चौकशीला बोलावले. मुलाच्या आईने या घटनेची माहिती देताना त्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसी खाक्या  दाखवताच शीतलने खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी केली. 

...असा केला खून 
लग्नाआधी प्रियकर साईनाथ जाधवसोबत शीतल हिचे प्रेमसंबंध होते. तिच्या मर्जीविरोधात घरच्यांनी लग्न लावले होते. तरीही दोघे भेटत होते. यावरून पती - पत्नीमध्ये वाद होता. प्रियकर साईनाथ याच्याकडे तिला जायचे होते. मात्र, मुलांना तो स्वीकारणार नसल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे शीतल हिने आपले पहिले प्रेम मिळविण्यासाठी पोटच्या मुलांनाच संपवले. शीतल हिने दोन्ही मुलांना टॉवेलच्या सहाय्याने नाक - तोंड दाबून ठार मारले. याबाबत शीतल पोले हिच्याविरोधत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read in English

Web Title: Both the children were killed by the mother for her lover; The police laid a cane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.