महाडमध्ये प्रदूषणमुक्तीसाठी हल्लाबोल, प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:46 AM2018-01-05T06:46:16+5:302018-01-05T06:46:39+5:30

‘एमआयडीसी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, महाड तालुका प्रदूषणमुक्त झालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो महाडकरांनी औद्योगिक वसाहतीवर हल्लाबोल केला. महाड औद्योगिक वसाहतीतील नागलवाडी फाटा ते प्रिव्ही आॅरगॅनिक्स कारखान्यादरम्यान या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

 Attack for pollution in Mahad, report to pollution control board | महाडमध्ये प्रदूषणमुक्तीसाठी हल्लाबोल, प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

महाडमध्ये प्रदूषणमुक्तीसाठी हल्लाबोल, प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

Next

दासगाव  - ‘एमआयडीसी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, महाड तालुका प्रदूषणमुक्त झालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो महाडकरांनी औद्योगिक वसाहतीवर हल्लाबोल केला. महाड औद्योगिक वसाहतीतील नागलवाडी फाटा ते प्रिव्ही आॅरगॅनिक्स कारखान्यादरम्यान या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाड औद्योगिक विकास कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन ठिकाणी निवेदन देण्यात आले. मात्र सीईटीपी या ठिकाणी कोणी अधिकारी नसल्याने मोर्चा पुढे वळवत कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रिव्ही आॅर्गनिक्स कारखान्यासमोर मोर्चा थांबवला. कारखाना प्रशासनाला जाब विचारत त्यांनाही निवेदन दिले.
गुरुवारी दुपारी माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पूर्व नियोजित आयोजनाने मोर्चा काढण्यात आला. महाड औद्योगिक वसाहतीतील कामगार, खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांसह हजारो महाडकरांनी या मोर्चाला उपस्थिती लावली. रात्रंदिवस प्रदूषणामुळे होरपळणारी औद्योगिक वसाहत, कामगारांवर होणारा अन्याय, खाडीपट्ट्यातील प्रदूषण यासह अनेक प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चादरम्यान औद्योगिक वसाहती सहायक अभियंता बाळासाहेब झंझे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना यावेळी निवेदन देण्यात आले. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणकारी कारखानदारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत आ.माणिक जगताप यांनी दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर चक्काजाम करू असा इशारा दिला. यावेळी कामगार नेते जितेंद्र जोशी, माजी जि. प. सदस्य इब्राहिम झमाने, माजी पं. स. सदस्य अश्विनी घरटकर, तालुकाध्यक्ष राजू कोर्पे, धनंजय देशमुख, केशव हाटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कामगारांबाबत प्रिव्ही कारखान्यात यशस्वी चर्चा
काही दिवसांपूर्वी युनियन केली म्हणून प्रिव्ही कारखान्याने पाच जणांना विनानोटीस निलंबित केले आहे. या प्रकरणी गुरुवारी मोर्चाच्या माध्यमातून जगताप यांनी प्रिव्ही कारखान्याला जाब विचारला. प्रिव्हीचे व्हाईस प्रेसिडंट राम सुर्वे यांनी माणिक जगताप आणि कामगार संघटनेचे जितेंद्र जोशी यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेदरम्यान उभयतांनी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे ठरले. कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न करू अशी भूमिका सुर्वे यांनी घेवून या प्रकरणी चर्चेला बसण्याचे निमंत्रण दिल्यानंतर प्रिव्ही काखान्याबाबतचा हा वाद तात्पुरता स्वरूपात संपुष्टात आला.
प्रिव्हीचे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर संभाजी पठारे यांच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त करीत हुकूमशाही सहन करणार नाही, असा इशारा जगताप यांनी प्रिव्ही कारखाना प्रशासनाला दिला.

पोलीस बंदोबस्त
प्रिव्ही आर्गनिक्स कारखान्याबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाड औद्योगिक वसाहतीतील हा मोर्चा औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यालय, सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा विविध ठिकाणी गेला. यापैकी कोठेही एक दोन पोलिसांव्यतिरिक्त पोलीस बंदोबस्त नव्हता. मात्र प्रिव्ही कारखान्याबाहेर काही वेगळीच परिस्थिती पाहावयास मिळाली.
या कारखान्याबाहेर ट्रॅकिंंग फोर्सचे जवान, महाराष्टÑ पोलिसांची बॅरिगेटिंग आणि चार टप्प्यात कारखान्याने लोखंडी पाइप लावून तयार केलेले बॅरिगेटिंग, कडेकोट सुरक्षा तयार केली होती. मोजक्याच माणसांना प्रवेश, कु लूप लावून दरवाजा बंद अशी चोख व्यवस्था देखील करण्यात आली होती.
एमआयडीसीच्या वतीने सहायक कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंझे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रमोद माने तर प्रिव्ही प्रशासनाच्या वतीने राम सुर्वे मोर्चेकºयांना सामोरे गेले. मात्र सीईटीपीच्या वतीने मोर्चेकºयांच्या सामोरे कोणीही गेले नाही. सीईटीपीचे मॅनेजर जयदीप काळे हे मिटिंगसाठी मुंबईला गेले असल्याचे सांगितले, तर एमएमचे अध्यक्ष संभाजी पठारे हे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये असल्याचे कारण देत वेळ मारून नेली.

Web Title:  Attack for pollution in Mahad, report to pollution control board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.