आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:07 AM2018-10-10T00:07:59+5:302018-10-10T00:08:09+5:30

अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, बुधवारी जिल्ह्यात तीन हजार ५४६ ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Adashakti : Better settlement to maintain law and order | आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त

आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त

Next

अलिबाग : अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, बुधवारी जिल्ह्यात तीन हजार ५४६ ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार १०८ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत, तर खासगी १७८ दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पांरपरिक घटस्थापना होणार असून, त्यात १८३ सार्वजनिक, तर एक हजार ७८३ खासगी घटांचा समावेश आहे. २०० सार्वजनिक, तर ९४ खासगी ठिकाणी देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार आहे.
दहा दिवसांच्या नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता नियमित पोलीस बंदोबस्तासह जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माणगाव व खालापूर या दोन ठिकाणी आरसीपी प्लाटून, तर पेण येथे एसआरपी प्लाटून राखीव सज्ज ठेवण्यात आली आहेत. ३०० पुरु ष व १०० महिला होमगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवासाठी चौल-रेवदंडा सज्ज
रेवदंडा : शारदीय नवरात्रोत्सवासाठी चौल-रेवदंडा परिसर सज्ज झाला असून, अनेक मंडळे मोठे मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई, नयनरम्य आरास, फुलांची सजावट, रांगोळीची नक्षी त्यात विराजमान होण्यासाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते तयारीत दिसत आहेत. साखरचौथचे गणपती विसर्जन झाल्यावर आबालवृद्धाचे लक्ष शारदीय नवरात्र उत्सवाकडे लागलेले असते. ती प्रतीक्षा संपून आता हवा असणाऱ्या शारदीय उत्सवाचा दिवस आल्याने देवीच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज दिसत आहेत. उद्यापासून परिसर गजबजणार असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे.

कोटेश्वरी मंदिरात
नवरात्र उत्सवाची तयारी
आगरदांडा : मुुुरुड-जंजिरा शहरात पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत कोटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठी गर्दी होते. मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्सवात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म सकाळपासून सुरू असणार आहेत.

१ हजार ३७६ विसर्जन मिरवणुका
दरम्यान, नवरात्रोत्सवांती १८ ते २१ आॅक्टोबर असे चार दिवस जिल्ह्यात एक हजार ३७६ विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये १८ आॅक्टोबर रोजी ७०१ सार्वजनिक, तर १६३ खासगी देवी मूर्तींच्या मिरवणुका आहेत. १९ आॅक्टोबर रोजी ४२७ सार्वजनिक, तर ७३ खासगी, २० आॅक्टोबर रोजी ११ सार्वजनिक आणि २१ आॅक्टोबर रोजी सात सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका होणार आहेत.

Web Title: Adashakti : Better settlement to maintain law and order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड