कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा :पुण्यात काँग्रेसचे सेलिब्रेशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:13 PM2018-05-19T19:13:10+5:302018-05-19T19:13:10+5:30

कर्नाटक विधानसभेत बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले. 

Yeddiyurappa resigns in Karnataka: Congress Celebrations in Pune | कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा :पुण्यात काँग्रेसचे सेलिब्रेशन 

कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा :पुण्यात काँग्रेसचे सेलिब्रेशन 

ठळक मुद्देयेडियुरप्पांच्या राजीनाम्याचे पुणे काँग्रेसने केले सेलिब्रेशन माजी मंत्री रमेश बागवेंनीही धरला ताल, महिलांनी घातला फुगड्या

 

पुणे : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले. 

येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर अखेर पडदा पडलाय. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. या घटनेमुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित सत्तेचा दावा करण्यास पात्र ठरले आहेत. याचे जोरदार सेलिब्रेशन पुणे शहर काँग्रेसने केल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले. यावेळी शहरातील ऐतिहासिक काँग्रेस भवनासमोर ढोल ताशा वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे,माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी ठेका धरला. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून या घटनेचा आनंद व्यक्त केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना लोकशाहीचा विजय झाला  अशी प्रतिक्रिया दिली. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस जेडीएससह नक्की सरकार स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Yeddiyurappa resigns in Karnataka: Congress Celebrations in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.