सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:22 PM2018-08-20T19:22:11+5:302018-08-20T19:31:48+5:30

सणसवाडी येथील सुपरवायझरने प्रेम प्रकरणातील भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला.

worker murder due a love affair by supervisers in Sanaswadi | सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून 

सणसवाडीत प्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून 

Next
ठळक मुद्देशिक्रापूर पोलीस ठाण्यात सुपरवायझर विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरने प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन कामगाराला चाकूने भोकसत त्याचा खून केला. ही घटना सोमवारी (दि.२० आॅगस्ट) सकाळी घडली आहे. याप्रकरणी अमित अभिमन्यू जाधव (रा. सणसवाडी ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी ता. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध खूनाचागुन्हा दाखल केला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथे मुलीच्या प्रेम प्रकरणातून दामोदर कृष्णा जबल (रा. सणसवाडी ता. शिरूर मूळ रा. धारावी, मुंबई )असे खून करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीत काम करणारा कामगार जबल व सुपरवायझर राठोड यांच्यात दोन दिवसापूर्वी एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून भांडणे झाली होती. त्यांनंतर त्यांच्या लेबर कॉनट्रॅक्टचे मालक अमित जाधव यांनी दोघांना समजावून सांगत दोघांनाही भेटायला बोलावले होते. मात्र, सोमवारी सकाळी कंपनी सुपरवायझर संतोष राठोड याने रागाच्या भरात सणसवाडी येथील संचेती कंपनीजवळ कामगार जबल याला चाकूने भोकसून खून करत पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु ,उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी फरार आरोपी संतोष राठोड याचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.

Web Title: worker murder due a love affair by supervisers in Sanaswadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.