पुसलेले रक्ताचे डाग दिसले अन् आरोपी अडकले! दिरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 06:40 PM2024-04-30T18:40:32+5:302024-04-30T18:50:37+5:30

पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड...

Wiped blood stains were seen and the accused were caught! The wife brutally killed her husband along with Dira | पुसलेले रक्ताचे डाग दिसले अन् आरोपी अडकले! दिरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

पुसलेले रक्ताचे डाग दिसले अन् आरोपी अडकले! दिरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

पिंपरी/आळंदी : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. खुनानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली आहे. रविवारी (दि. २८) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास चऱ्होली हद्दीतील थोरवेवस्ती येथे ही घटना घडली आहे.

हुजूर महंमुद सय्यद (वय ३२, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची अठ्ठावीस वर्षीय पत्नी आणि फिरोज महंमुद सय्यद (वय ३८ रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे वस्ती, चऱ्होली येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद मयत झाले होते. सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

मात्र, पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली असता सय्यद यांना झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती, मयताची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय चौकशीत समोर आला आहे.

धडक घेऊन आत्महत्या?

मृत्यू झालेल्या सय्यद यांच्या जखमांची स्थिती पाहता धडक घेऊन या जखमा झाल्या नसाव्यात, धडक घेऊन आत्महत्या करणे अशक्य आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

Web Title: Wiped blood stains were seen and the accused were caught! The wife brutally killed her husband along with Dira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.