उन्हाळा कधी सुरु होणार? हवेतील गारवा जाईना, मार्चमध्येही चटका जाणवेना!

By श्रीकिशन काळे | Published: March 10, 2024 04:20 PM2024-03-10T16:20:12+5:302024-03-10T16:20:52+5:30

सकाळी आणि रात्रीच्या थंड वाऱ्यांमुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत असून दुपारी जरासा ऊन तापत आहे

When does summer start The chill in the air does not go away even in March it does not feel hot! | उन्हाळा कधी सुरु होणार? हवेतील गारवा जाईना, मार्चमध्येही चटका जाणवेना!

उन्हाळा कधी सुरु होणार? हवेतील गारवा जाईना, मार्चमध्येही चटका जाणवेना!

पुणे : कडक उन्हाळा मार्च महिन्यात सुरू होतो, परंतु, सध्या अद्यापही हवेत गारवा जाणवून असून कडक उन्हाचा चटका पुणेकरांना बसत नाही. सकाळी आणि रात्री देखील थंड वाऱ्यांमुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुपारी जरासा ऊन तापत असून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.

राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. १२ मार्चपर्यंत किमान तापमानात किरकोळ वाढ होणार आहे. पुण्यात व परिसरातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कमाल तापमानात बदल होणार नसल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. नुकताच ‘सीईई’ या संस्थेच्या अहवालानूसार यंदाचा उन्हाळा तापदायक असल्याचे स्पष्ट केले होते, पण मार्च महिना सुरू झालेला असला तरी देखील उन्हाचा ‘ताप’ काही वाढताना दिसत नाही. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे गारवा जाणवत आहे. पुण्यामध्ये मार्च महिन्याचे दहा दिवस झाले तरी कमाल तापमान ३५ अंशावरच आहे. तर किमान तापमान १५ अंशाच्या खाली आहे. काही भागात तर हे १२ अंशावर नोंदवले जात आहे. शहरात दुपारी उष्णता आणि सकाळी, सायंकाळी गारवा या हवामानबदलामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळच्या गारव्यामुळे दुपारनंतर चांगलाच ऊबदारपणा पुणेकरांना जाणवत आहे.

गेल्या महिन्यामध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क, वडगावशेरी भागातील किमान तापमान २० अंशापर्यंत नोंदवले जात होते. पण आता मात्र येथील किमान तापमान बरेच खाली आले आहे. उन्हाळा असतानाही या ठिकाणी १३-१४ अंशावर किमान तापमान आहे. त्यामुळे शहरातील हवामानात खूप बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील किमान तापमान

हवेली : १२.५
कोरेगाव पार्क : १२.७
मगरपट्टा : १२.८
वडगावशेरी : १३.२
शिवाजीनगर : १४.८
पाषाण : १५.८

जम्मू काश्मीर, लेह-लडाख आणि हिमाचल प्रदेश या राज्यात, एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, (रविवार व मंगळवार) दि.१० व १२ मार्च रोजी रात्री प्रवेश करणार आहेत. त्यामुळे १० ते १४ मार्च असे ५ दिवस तेथे वारा विजांच्या गडगडाटीसह पाऊस, बर्फबारी व थंडी जाणवेल. परिणामी आपल्याकडे महाराष्ट्रातही त्या ५ दिवसात वातावरण कोरडे राहून केवळ पहाटेची थंडीच फक्त जाणवणारच आहे. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: When does summer start The chill in the air does not go away even in March it does not feel hot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.