संत सोपानकाका पालखीचे स्वागत उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 01:30 AM2018-07-12T01:30:27+5:302018-07-12T01:30:45+5:30

संत सोपानदेव महाराजांची पालखी पांगारे येथील मुक्काम आटोपून परिंचे येथे विसाव्यासाठी थांबली होती. ग्रामपंचायत व प्रशासनच्या वतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.

Welcome to Saint Sopankaka Palcchi | संत सोपानकाका पालखीचे स्वागत उत्साहात

संत सोपानकाका पालखीचे स्वागत उत्साहात

Next

परिंचे - संत सोपानदेव महाराजांची पालखी पांगारे येथील मुक्काम आटोपून परिंचे येथे विसाव्यासाठी थांबली होती. ग्रामपंचायत व प्रशासनच्या वतीने भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.
ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने गावाच्या वेशीपासून पालखीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. पुरंदर नागरी पथसंस्थेच्या वतीने प्रत्येक दिंडीचे हार, नारळ देऊन स्वागत करण्यात आले.
सरपंच समीर जाधव व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते सोपानदेव देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. गोपाळकाका गोसावी यांचे हार, श्रीफल व शाल देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचे पाणी, दर्शनरांगा, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छता अशी व्यवस्था पुरवण्यात आली होती.

संत सोपानदेव महाराजांच्या पादुकांची डॉ. शरद देशपांडे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली.
वीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखीसाठी रुग्णवाहिका व पाण्याचा टँकर पंढरपूरपर्यंत सेवा पुरवणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. या वेळी ट्रस्टचे सचिव तय्यद मुलाणी
उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत जलशुद्धीकरण, बाह्यरुग्ण तपासणी, रुग्णवाहिका पुरविण्यात आली होती.
प्रत्येक दिंडीला प्रथमोपचार बॉक्सचे वाटप करण्यात आले. गावकºयांच्या वतीने वारकºयांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आठवडेबाजार व बाहेरून आलेल्या दुकानांमुळे परिंचे परिसराला यात्रेचे स्वरूप
आले होते.

खंडेरायाच्या दर्शनाला वैष्णवांची गर्दी

जेजुरी : संत सोपानकाकांच्या सासवडनगरीचा निरोप घेऊन माऊलींच्या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणा-या खंडेरायाच्या जेजुरीकडे प्रस्थान केले. सकाळचा पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरणात माऊलीभक्त जेजुरीनगरीत दाखल झाले.
दूरवरून कुलदैवताचा मल्हारगड दिसताच
‘वारी हो वारी, देई गा मल्हारी त्रिपुरारी हारी, तुझ्या वारीचा भिकारी’ ही संत एकनाथमहाराजांची ओवी माऊलीभक्तांच्या मुखातून येऊ लागली. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. भंडारा हे मल्हारीचे लेणे आहे.
या भंडाºयाच्या लेण्यासाठी मी मल्हारीच्या वारीचा भुकेला आहे, अशी माऊलीभक्तांची धारणा आहे. त्यामुळे जेजुरीनगरीत मल्हारगडाचे दर्शन होताच माऊलीभक्तांनी गडाकडे खंडेरायाच्या दर्शनासाठी धाव घेतली.

खंडेरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या माऊलीभक्तांनी ‘येळकोट-येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात मल्हारगडाच्या पायºयांची चढण चढली. गडावर भंडारखोबºयाची मुक्त हस्ताने उधळण करीत रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. या वेळी माऊलीभक्तांनी वरुणराजाला कृपा करण्याचे कुलदैवताला साकडे घातले. संपूर्ण दिवसभर माऊलीभक्तांनी मल्हारगडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले.

ज्या वारक-यांना गडावर जाणे शक्य नाही, वयोवृद्धांसाठी देवस्थानाकडून येथील मुख्य चौकात स्क्रीनवरून थेट गाभा-यातीलदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. वारकरी भक्तिभावाने दर्शन घेऊन वारी चालत होते.

Web Title: Welcome to Saint Sopankaka Palcchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.