पाणीकपातीचा निर्णय महिनाभर होणार नाही, पालकमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:58 AM2018-12-29T01:58:41+5:302018-12-29T01:58:53+5:30

पुण्याच्या पाणीकपातीबाबत अद्याप आपली कोणाशीही चर्चा झालेली नाही. कपात आणखी वाढवायची असल्यास सर्वांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

Water cut will not be a month | पाणीकपातीचा निर्णय महिनाभर होणार नाही, पालकमंत्र्यांचे आश्वासन

पाणीकपातीचा निर्णय महिनाभर होणार नाही, पालकमंत्र्यांचे आश्वासन

Next

पुणे : पुण्याच्या पाणीकपातीबाबत अद्याप आपली कोणाशीही चर्चा झालेली नाही. कपात आणखी वाढवायची असल्यास सर्वांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत शहराला आहे तेवढेच पाणी सुरू ठेवावे अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी महापालिकेत दिल्या.
जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशानुसार, गुरुवारी पाटबंधारे विभाग तसेच महापालिका आयुक्तांची बैठक झाली होती. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय आपल्या हातात नाही, पालकमंत्री स्तरावरच हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले होते.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता महापौर बंगल्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात होती. तत्पूर्वी पाच वाजता पालकमंत्री बापट महापालिकेत प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीसाठी आले होते. त्याच वेळी जलसंपदा विभागाचे अधिकारीही पालिकेत होते.
प्रलंबित प्रश्नांची बैठक संपताच आयुक्त राव यांनी पालकमंत्र्यांकडे हा विषय काढला. मात्र, आपल्या या अजेंड्यावर आपण बोलणार नाही असे ते म्हणाले.
मात्र, आयुक्तांनी गुरुवारच्या
बैठकीत झालेल्या चर्चेची
माहिती देत; जलसंपदा विभागाचे अधिकारीही आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बापट यांनी या विषयावर बैठक घेतली.

तातडीने निर्णयाची मागणी : पुणेकरांमध्ये धास्तीचे वातावरण

1 जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पाणीकपात गरजेची असल्याचे सांगत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मात्र, बापट यांनी ती फेटाळून लावली. या विषयावर अद्याप वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. हा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी किमान महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने तूर्तास पालिकेस आहे तेवढे पाणी सुरूच ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

2जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुण्याच्या पाण्यात कपात करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. महापालिकेला पाणीपुरवठा करण्याबाबत अडचणी येणार आहेत. संपूर्ण वेळापत्रक कोलमडून जाणार आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी एक महिना मुदत दिल्याने आता दिलासा मिळणार आहे.

Web Title: Water cut will not be a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.