वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटींना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:13 PM2018-10-03T23:13:28+5:302018-10-03T23:13:54+5:30

महसूल विभागाची कारवाई : ३५ ते ४० लाखांचे नुकसान; वाळूचोरांचे धाबे दणाणले

Water for 8 boats in the vicinity | वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटींना जलसमाधी

वाळूउपसा करणाऱ्या ८ बोटींना जलसमाधी

Next

देऊळगावराजे : खानवटे, मलठण, राजेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीपात्रात गेल्या दोन दिवसात दोनवेळा बेकायदेशीर वाळूउपसा करणाºया फायर बोटीवर महसूल विभागाने कडक कारवाई केली. या कारवाईत ८ फायबरच्या बोटींना जिलेटिनच्या साह्याने जलसमाधी देण्यात आली. यामध्ये वाळूतस्करांचे अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली.

खानवटे परिसरात अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी विजय खारतोडे, म्हस्के तलाठी, हरीचंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंगे, शंकर दिवेकर, अभिमन्यू जाधव, पाच पोलीस कॉन्स्टेबल या पथकाने ही कारवाई केली. कुठल्याही वाळूचोराला याची खबर लागणार नाही, अशी काळजी घेऊन हे पथक भीमा नदीपात्रात कारवाई करण्यासाठी गेले. यामध्ये फायबर बोटी जिलेटीनच्या साह्याने फोडण्यात आले. यावेळी सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. यावेळी पथकाला पाहून काही वाळूमाफियांनी तेथून पळ काढला. त्यानंतर सलग दुसºया दिवशीही राजेगाव परिसरात स्वत: तहसीलदार बालाजी सोमवंशी कारवाईसाठी आले. त्यांना पाहून वाळूचोरांना जरब बसली. या कारवाईत २ फायबर, १ बोट जिलेटीनच्या साह्याने उडवून दिली. यात वाळूचोरांचे अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे सततच्या कारवाईमुळे वाळूचोरांना चांगलाच धसका बसला असल्याने परिसरातील वाळूचोर हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पथकाला पाहून काही वाळूचोरांनी बोटी फायबर कर्जत, श्रीगोंदा, खेड तालुक्याच्या हद्दीत लपवून ठेवल्या. ही कारवाई बºयाच उशिरापर्यंत चालली होती.
गय केली जाणार नाही

भीमा नदीपात्रात सातत्याने वाळूचोरांवर कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कोणत्याही वाळूचोराची गय केली जाणार नाही.
- बालाजी सोमवंशी तहसीलदार, दौंड

चाकणला तीन अवैध वाळूवाहनांवर कारवाई

चाकण : अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनचालकांवर चाकण पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. येथील शिक्रापूर रोडवरील जयहिंद हॉस्पिटलसमोर सात ब्रास वाळूसह दोन ट्रक व एक ट्रॅक्टर असा ऐवज मिळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या चोरून आणलेली वाळू भरलेल्या तीन गाड्या चाकण येथील शिक्रापूर रोडवरील जयहिंद हॉस्पिटलसमोर उभ्या असल्याचे गुप्त खबºयाकडून माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. बोराटे, पो. कॉ. भोजने, होमगार्ड राऊत, होमगार्ड भोसले यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. सहायक फौजदार दत्तात्रय शामराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक कैलास भाऊसाहेब गायकवाड (रा. काळुस), नंदू सुखदेव कदम (रा. काळूस) व लक्ष्मण तुकाराम मंजुळकर (रा. कडाचीवाडी, चाकण) यांच्यावर ट्रकसह वाळू असा ६ लाख ६५ हजार ७५० रुपयांचा ऐवज बेकायदा बिगरपरवाना चोरून आणून वाहतूक करताना मिळून आल्याने भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Water for 8 boats in the vicinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे