कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 05:25 PM2019-02-20T17:25:56+5:302019-02-20T17:30:02+5:30

राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो.

Wait for four months for a permanent vehicle license! Status of RTO | कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती 

कायमस्वरुपी वाहन परवान्यासाठी चार महिने थांबा ! आरटीओतील स्थिती 

Next
ठळक मुद्देसुट्टीच्या दिवशी कामकाज सुरु ठेवण्याची उमेदवारांची मागणी शहर आणि परिसरातून वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील अधिकशिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन दिवस आणि वेळ आरक्षित करावा लागतो. शिकाऊ परवाना घेतल्यानंतर ३० दिवसांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास या त्रासातून सुटकाअधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल

पुणे : कायमस्वरुपी वाहनपरवाना मिळविण्यासाठी चार महिने थांबा, अशी स्थिती प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) झाली आहे. त्रस्त उमेदवारांनी बुधवारी आरटीओ कार्यालयात धरणे धरत, सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याची मागणी केली. 
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळ आणि वाहन परवाना प्रलंबित असलेल्या उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील वाहनसंख्येचे चाळीस लाखांच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे. राज्यातील सर्वाधिक वाहन नोंदणी होणाऱ्या कार्यालयात पुणे आरटीओ कार्यालयाचा वरचा क्रमांक लागतो. त्यामुळे साहाजिकच शहर आणि परिसरातून वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्यासाठी ऑनलाईन दिवस आणि वेळ आरक्षित करावा लागतो. 
शहरात शिकाऊ वाहन परवान्याच्या तुलनेत पक्क्या वाहन परवान्याचा कोटा कमी आहे. त्यामुळे पक्क्या परवान्यासाठी आॅनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास थेट चौथ्या महिन्यातील तारीख मिळत आहे. शिकाऊ परवान्यासाठी देखील एक ते दीड महिन्याची प्रतिक्षा यादी आहे. पक्क्या वाहन परवान्याची प्रतिक्षा यादी ६ हजारांच्यावर गेली असल्याची तक्रार पुणे शहर ड्रायव्हिंग असोसिअशनच्या वतीने, आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 
शिकाऊ परवाना काढल्यानंतर उमेदवाराला ९० दिवसानंतर पक्क्या वाहन परवान्यासाठी दिवस आरक्षित होत नाही. त्यामुळे उमेदवाराला पक्क्या परवान्याची परीक्षा देता येत नाही. शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिन्यांसाठी असते. त्याची मुदत संपेपर्यंत पक्का परवान्याची वेळ आरक्षित करण्याची मुभा दिली पाहिजे. वाढती प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी दुसरा व चौथा शनिवार, तसेच दर रविवारी देखील वाहन परवान्याची चाचणी सुरु ठेवावी अशी मागणी संघटना आणि उमेदवारांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 
याबाब माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे म्हणाले, पक्क्या वाहन परवान्यासाठी चौथ्या महिन्यातील तारीख मिळत असल्याची तक्रार उमेदवारांनी केली. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु करण्याचा विचार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी परवानगी दिल्यानंतर सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरु करण्यात येईल. 
--
शिकाऊ परवानाधारक उमेदवार अनेकदा शेवटच्या महिन्यात पक्क्या परवान्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेताना दिसतात. शिकाऊ परवाना घेतल्यानंतर ३० दिवसांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्यास या त्रासातून सुटका होऊ शकते. प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल. - विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

Web Title: Wait for four months for a permanent vehicle license! Status of RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.